शिवसेना मजबूत करा; कोपरगावचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल, शिवसंपर्क अभियान; आमदार सुनील  शिंदे यांचा दावा  

शिवसेना मजबूत करा; कोपरगावचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल, शिवसंपर्क अभियान; आमदार सुनील  शिंदे यांचा दावा  

Strengthen Shiv Sena; The next member of Kopargaon will be Shiv Sampark Abhiyan; Mla  Sunil Shinde Vikas claims

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Mon 30 May 2022, 16.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ‘शिवसंपर्क अभियाना’च्या निमित्ताने आज पोहेगावकरांनी शिवसैनिकांचा सळसळता उत्साह आणि आवेश अनुभवला. शिवसेना मजबूत करा, कोपरगावचा पुढचा आमदार शिवसेनेचा असेल, असा दावा  आज वक्रतुंड मंगल कार्यालय पोहेगांव येथे ‘संवाद मेळाव्यात ’  आमदार सुनील  शिंदे यांनी केला.

 आ. सुनील शिंदे  यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱयांच्या समस्या जाणून घेऊन कोपरगाव तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्त्वाची दिशाभूल करून शिवसेनेत गट तट पाडले जातात.तेंव्हा पक्ष-संघटना भक्कमपणे उभी करण्याच्या दृष्टीने त्यांना दिशादर्शन केले. ‘कोणाच्याही आमिषाला आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बळी न पडता शिवसेना पक्षवाढीसाठी काम करा कुठल्याही गटाचे प्यारे होऊ नका शिवसेनेचे व्हा ,’ असा कानमंत्र त्यांनी दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभर राबविल्या जात असलेल्या ‘शिवसंपर्क अभियाना’चा दुसरा टप्पा कालपासून  कोपरगाव तालुक्यात सुरू झाला आहे. या कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी  शिवसैनिक व पदाधिकाऱयांच्या अडचणी समजून घेतल्या. अध्यक्षस्थानी उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे होते. 
शिवसंपर्क अभियान प्रमुख आ सुनील शिंदे यांचा पोहेगांव येथे शिवसंपर्क अभियान टप्पा दोन मेळाव्यात स्वागत करताना शिवसेनेचे नितीन औताडे, रावसाहेब  खेवरे, राजेंद्र झावरे
नितीन औताडे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असून अनेक योजना त्यांनी मार्गी लावले आहेत. खा. सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे धरण प्रकल्पासाठी लढा दिला पायी दिंडी काढली मुंबईला उपोषण केले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या निळवंडे प्रकल्पाचा प्रश्न निकाली काढत भरघोस निधी मंजूर केला आहे. लवकरच या धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाणार आहे. अनेक विकासात्मक कामे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पूर्ण होत असून ही झालेली कामे सर्वसामान्य नागरिकांना सांगण्याची जबाबदारी शिवसैनिकाची असून त्यांनी ती पार पाडली पाहिजे. की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. निळवंडे प्रकल्पासाठी १०५६ कोटी निधीची तरतूद केली. हा प्रकल्प १८२ गावांना वरदान ठरणार आहे. जल जीवन योजना असो किंवा दळणवळणासाठी गावागावात वाड्या-वस्त्यांवर अनेक रस्ते मंजूर झालेले असो याचे सर्व श्रेय मित्र पक्ष घेतो. शिवसेना पक्ष बळकटीसाठी आपण ताकद द्यावी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. त्यासाठी देखील आपण शिवसैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन नितीन औताडे यांनी पक्षाकडे आमदार शिंदे यांच्या मार्फत केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख कलविंदर दडीयाल, शिवाजी रहाणे, किरण खर्डे, मुकुंद सिनगर, ,अक्षदा आमले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिवाजी रहाणे, किरण खर्डे, मुकुंद सिनगर, गणेश जाधव, अशोकराव नवले, दादासाहेब औताडे, विलास रत्ने,अरूण डोखे, अशोक पवार, प्रभाकर होन, सरपंच अमोल औताडे, संजय गुरसळ, अभिषेक आव्हाड, अहमद पटेल, विशाल झावरे, राजेंद्र औताडे आदींसह  शिवसैनिक व युवती सेनेच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  बाळासाहेब रहाणे यांनी केले तर आभार  राजेंद्र झावरे यांनी मानले.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page