कोल्हे साखर कारखाना ; देशात फार्मा आणि फ्युअल क्षेत्रात येणाऱ्या दशकात वेगळ्या उंचीवर राहील – बिपिन कोल्हे

कोल्हे साखर कारखाना ; देशात फार्मा आणि फ्युअल क्षेत्रात येणाऱ्या दशकात वेगळ्या उंचीवर राहील – बिपिन कोल्हे

Kohle  sugar factory; The country’s pharma and fuel sector will remain at a different height in the coming decades – Bipin Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Mon 6 June, 19.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव :पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व त्यांच्या सर्व सहका-यांनी इथेनॉल निर्मीतीस प्रोत्साहन देवून त्यानुरूप धोरणे घेतली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील साखर उद्योगाच्या अडचणी मांडून त्याची सोडवणुक केली. इथेनॉल बाबत घेतलेले धोरणामुळे तोट्यात जाणाऱ्या साखर धंद्याला ऊर्जितावस्था मिळाली आहे. भारताचा साखर धंद्याचा ट्रेंड पाहता कोल्हे साखर कारखाना साखर कारखाना न राहता देशात फार्मा आणि फ्युअल क्षेत्रात येणाऱ्या दशकात वेगळ्या उंचीवर राहील असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकरराव कोल्हे  कारखान्याचे अध्यक्ष  बिपिन कोल्हे यांनी अध्यक्षपदावरून कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाच्या सांगता प्रसंगी केले. इतिहासात प्रथमच उच्चांकी ९ लाख ४२ हजार ५०९ मे. टन उसाचे गाळप केले. संजीवनी कारखान्याचे नामकरण सहकार महर्षी शंकरराव कोल्हे केल्यानंतर खऱ्या अर्थाने यशाची घोडदौड सुरू झाल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी व्यक्त केले.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्या ५९ व्या गळीत हंगामाची सांगता संचालक प्रदिप नवले, सौ. प्रतिभा नवले यांच्या हस्ते श्री सत्यनारायण  महा पूजेने करण्यात आली.

ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व इ इथॉक्सी मिथाईल मॅलेनिक ईस्टर हि रासायनिक उपपदार्थ तयार करावयाचे त्याच्या प्रत्यक्ष उत्पादनाचाही शुभारंभ संचालक युवानेते विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते झाला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व कार्यकारी संचालक बाजीराव सुतार दिसत आहे. (फोटो जय जनार्धन)

तर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते सहकारातुन ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व इ इथॉक्सी मिथाईल मॅलेनिक ईस्टर हि रासायनिक उपपदार्थ तयार करावयाचे त्याच्या प्रत्यक्ष उत्पादनाचाही शुभारंभ संचालक युवानेते विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी (६जुन) झाला.

 

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात चालू गळीत हंगामाचा आढावा देवुन यावर्षी आलेल्या अडचणींचे निराकरण पुढील वर्षी करण्यांसाठी अभ्यासु अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संजीवनीने काय नियोजन हाती घेतले आहे याबाबतची संपुर्ण माहिती देत कारखान्यांस वसंतदादा शुगर इन्स्टीटयूटकडुन मिळालेला सर्वोत्कृष्ट तांत्रीक कार्यक्षमतेचा पुरस्कार स्व. शंकरराव कोल्हे यांना समर्पित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बिपीन कोल्हे म्हणाले, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या अभ्यासातून नवनविन तंत्रज्ञानाचा आधार घेत काळाच्या कितीतरी अगोदर पुढे जात उसापासून केवळ साखर एके साखर उत्पादन न घेता हायड्रोजनेशनचा पाया घातला त्यातुन उपपदार्थ निर्मातीबरोबरच औषधी उत्पादने घेतली आणि देशात सर्वप्रथम सहकारी तत्वावर ज्युस पासून इथेनॉल बनविणारा कोल्हे कारखाना ठरला असुन त्याचे लवकरच पेटंट मिळविणारा एकमेव कारखाना ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
बिपीन कोल्हे म्हणाले की, चालूवर्षी उसतोडणी कामगारांच्या बाबतीत वाईट अनुभव आला, उसाचे उत्पादन वाढते आहे. गाळप क्षमता एका दिवसात वाढत नसते, त्यासाठी पुढच्या हंगामाची तयारी आम्ही आजपासुन सुरु केली असून सभासदांच्या मालकीचे हार्वेस्टर झाले पाहिजे यावर आपला जोर असणार आहे. केवळ साखर उत्पादन घेवुन सहकारी कारखानदारी चालविणे तोटयाचे आहे. जगात ब्राझील सर्वाधिक साखर निर्यातीचा देश असायचा पण यंदा रशिया युक्रेन युध्दामुळे ब्राझीलने इथेनॉल उत्पादनावर भर दिला त्यामुळे साहजीकच भारत देश जगात साखरेचा पहिला निर्यातदार देश बनला आहे. अन्यथा येथील उद्योगाला ३०० ते ४०० रूपये प्रतिटन तोटा सहन करावा लागला असता.
बिपीन कोल्हे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीवर भर देत येथेच स्वतःच्या सुसज्ज संशोधन प्रयोगशाळा उभारून जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. यादव यांच्याबरोबरच देश विदेशातील तंत्रज्ञांचे मार्गदर्शन आम्ही घेत असून त्याजोरावर पॅरासिटामोल औषधी उत्पादन घेणा-या पहिल्या क्रमांकावर संजीवनीचेच नाव असणार आहे.
विटामिन ए आणि बी यासह इतर ३० औषधात ट्रायईथाइल ऑर्थोफॉर्मेट व जेनेरीक औषधात इथॉक्सी मिथाईल मैलेनिक ईस्टर या रासायनिक उपपदार्थाचा समावेश आहे त्याचे उत्पादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यात युवानेते विवेक कोल्हे यांच्या कल्पकतेतून सुरू झाले आहे.

याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संचालक सर्वश्री. अरूणराव येवले, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, राजेंद्र कोळपे, फकिरराव बोरनारे, अशोक औताडे, मनेष गाडे, निवृत्ती बनकर, मच्छिद्र लोणारी, ज्ञानेश्वर परजणे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे. विश्वासराव महाले, मच्छिंद्र टेके, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, कैलास माळी, भास्करराव तिरसे, साहेबराव रोहोम, विक्रम पाचोरे, सुनिल देवकर, साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, चीफ केमिस्ट विवेक शुक्ला, चीफ इंजिनियर के के शाक्य, केन मनेजर जी बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सचिव तुळशीराम कानवडे यांच्यासह विविध संस्थाचे आजी माजीपदाधिकारी, संचालक, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कार्यकर्ते, संजीवनी उद्योग समुहातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, कामगार मोठया संख्येने उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी शेवटी आभार मानले.

चौकट
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला आयकराचा प्रश्न मार्गी लावला म्हणून साखर उद्योगाला बरे दिवस आले आहेत. शासन उसाची एफआरपी वाढवते त्याचबरोबर त्यांनी कारखानदारांना दिलासा देण्यासाठी साखर विक्रीच्या न्युनतम किमतीतही त्याच रेषोप्रमाणे वाढ करावी. – बिपीन कोल्हे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page