प्रधानमंत्री आवास योजना; ४१ लाभार्थ्यांना ना. काळेंच्या हस्ते १८ लाखांचे अनुदान

प्रधानमंत्री आवास योजना; ४१ लाभार्थ्यांना ना. काळेंच्या हस्ते १८ लाखांचे अनुदान

Pradhan Mantri Awas Yojana; 41 beneficiaries no. 18 lakh grant at the hands of Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 7 June, 16.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : प्रधानमंत्री आवास योजनेच्या कोपरगाव शहरातील पात्र ४१ लाभार्थ्यांना क्रिकेट नगरपालिकेत नामदार आशितोष काळे यांच्या हस्ते १८ लाखाच्या अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी ना काळे यांनी शासनाच्या निधीचा सदुपयोग करून घराचे स्वप्न साकार करा असे आवाहन लाभार्थ्यांना केले.

ना. काळे पुढे म्हणाले की,१९९० पासून देशातील नागरिकांच्या घरांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक योजना सुरू आहेत. त्या माध्यमातून कोपरगाव शहरातील हक्काचा निवारा नसलेल्या देशातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल व हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर घरकुल अनुदान देत आहे. जास्तीत जास्त पात्र नागरिकांना घरकुलाचा लाभ कसा मिळवून देता येईल. हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगर अभियंता सुनील ताजवे, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता हर्षवर्धन सुराळकर, सहाय्यक रचनाकार दिपक बडगुजर, नितेश मिरीकर, पाणी पुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, विद्युत अभियंता रोहित सोनवणे, कर अधिकारी श्वेता शिंदे, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, लेखाअधिकारी तुषार नानकर, प्रदीप गाडगे, भालचंद्र उंबरजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी, राजेंद्र आभाळे, नारायण लांडगे, नितीन गुंजाळ, शिवाजी कुऱ्हाडे आदी मान्यवरांसह प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page