शेतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा- ॲक्सल ॲन्जेली.
Use technology for agriculture – Axel Angeli.
शेती विषयक परीसंवादSeminar on Agriculture
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Tue 7 June, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: शेतीमालाचे अधिक उत्पादन, खर्चाची बचत, मनुष्य बळाचा कमी वापर, इत्यादी बाबी व षेती विषयक समस्या सोडविण्यासाठी रोबोटीक्स,आर्टिफिशिअल, इंटिलीजन्स, मशिन लर्निंग, डीजिटल ट्वीन, अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. सध्या युरोपियन देहसत या तंत्रज्ञानाचा वापराने शेतीमध्ये अमुलाग्र बदल झाले आहे, असे प्रतिपादन जर्मनी मधिल डीजीटल फ्युचर इन्व्ह्याॅनजिलिस्ट,ॲक्सल ॲन्जेली यांनी केले.शेती विषयक समस्या कशा दुर करता येतील यावर मार्गदर्शन केले.
संजीवनी अभियांत्रिकीच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशनस् डीपार्टमेंटने विद्यार्थी व प्राद्यापकांसाठी आयोजीत केलेल्या शेती विषयक परीसंवादात ते बोलत होते.
यावेळी संजीवनी ग्रुपचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, काॅम्प्युटरचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, डीन डाॅ. महेंद्र गवळी, सर्व विभाग प्रमुख व डीन, प्राद्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी डाॅ. क्षिरसागर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून ॲन्जेली यांना संजीवनी ग्रुपच्या संस्थांची माहिती दिली.
अमित कोल्हे यावेळी म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकीत जरी आधुनिक तंत्र ज्ञानाचे धडे दिले जातात, परंतु हेच तंत्रज्ञान शेती विषयक समस्या सोडविण्यासाठी अथवा परवडणारी शेती करण्यास कसे उपयोगी पडू शकते, हे या परीसंवादा मार्फत अधिक स्पष्ट होणारे आहे.
यावेळी ॲन्जेली यांनी युरोपमध्ये कंपन्या त्यांना लागणाऱ्या मनुष्यबळातील स्कील सेटस् बाबत तेथिल विद्यापीठांना अथवा काॅलेजेसला माहिती देतात, त्यानुसार शिक्षणाची अंमलबजावणी होवुन कुशल मनुष्यबळ निर्माण होवुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रोबोटचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. याद्वारे पाण्याची व वेळेची बचत तसेच कामात अचुकता साधता येवु शकते. युरोपमध्ये भारतात एका एकरात जे उत्पादन होते त्याच्या पाच पट तर आफ्रिकेतील एका एकराच्या उत्पादनापेक्षा दहा पट उत्पादन युरोपमध्ये घेतल्या जातेे. शेती विषयक नवनवीन संशोधनाची गरज असल्याचे सांगुन ते म्हणाले की अशा संशोधनासाठी युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटीफिक अँड कल्चरल आर्गनायझेशन (युनेस्को) तसेच युरोपियन युनियन (इयु) यांच्याकडून आर्थिक मदत मिळु शकते. प्राद्यापक व शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची ॲन्जेली यांनी उत्तरे दिली. विद्यार्थीनी मुग्धा लभडे हीने सुत्रसंचलन केले तर डाॅ. महेंद्र गवळी यांनी आभार मानले.





