संवत्सर ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवाससाठी २२.७८ कोटी  मंजूर – ना. आशुतोष काळे

संवत्सर ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवाससाठी २२.७८ कोटी  मंजूर – ना. आशुतोष काळे

22.78 crore sanctioned for rural hospital and staff accommodation of 30 beds every year – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 June, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात संवत्सर येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने २२.७८ कोटी निधी मंजूर केल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे

आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी ना. आशुतोष काळे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास १०० बेड व उपजिल्हा रुग्णालय , माहेगाव देशमुख या ठिकाणी देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे. पूर्व भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा जवळच्या गावात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंत्रालय स्तरावरील मान्यता मिळावी यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्न करीत आहेत. संवत्सर व लगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे होते. त्या प्रयत्नांना यश मिळून या ग्रामीण रुग्णालयासाठी १७.१५ कोटी, कर्मचारी वसाहतीसाठी ५.६३ कोटी असा एकूण २२.७८ कोटी निधीस महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिली आहे. त्याबद्दल ना. आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

चौकट :- कोपरगाव ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास त्यांनी महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय मान्यता मिळवून २८.८४ कोटी निधी देखील आणला आहे. माहेगाव देशमुख येथे सुरु असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र येत्या काही महिन्यात आरोग्य सेवा देण्यास सज्ज होणार असून तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रास व संवत्सर ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी वसाहतीसाठी महाविकास आघाडी सरकारने २२.७८ कोटी निधी मंजूर केल्यामुळे कोपरगाव मतदार संघ आरोग्याच्या बाबतीत लवकरच स्वयंपूर्ण होईल-ना.आशुतोष काळे.

Leave a Reply

You cannot copy content of this page