कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सदस्यपदाचे आरक्षण जाहीर
Kopargaon Municipal Council announces reservation for general election membership
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 13 June, 14.00
By
राजेंद्र सालकर
हायलाइट्स:
१३ जून २०२२ रोजी आरक्षण सोडत
१५ ते २१ जून २०२२ या कालावधीत हरकती व सूचना,आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल,
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषद सदस्यपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी १३ जून २०२२ रोजी नगर पालिका प्रांगणात ११ वाजता आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यात १५ प्रभाग ३० जागा पैकी १५ जागा महिलासाठी राखीव ९ प्रभाग सर्वसाधारण जागासाठी,५ प्रभाग अनुसूचित जातीसाठी राखीव व प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव,झाले अशी माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी आज येथे दिली.
सोमवारी १३ जून २०२२ रोजी कोपरगाव नगरपालिका येथे उर्दू शाळेची इयत्ता पाचवीतील कु. आयेशा फिरोज शेख हिच्या हस्ते अनुसूचित जाती जागेसाठी आरक्षण सोडत चिठ्ठीव्दारे काढण्यात आली.
सोडतीत अनुसूचित जाती राखीवसाठी २,८,९, ११,१५ प्रभागांचा समावेश झाला असून यातील २ अ, ८ अ, ११अ, महिलासाठी राखीव तर ९ अ, १५ अ खुल्या वर्गासाठी राखीव झाला आहे. तर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ५ अ खुल्या वर्गासाठी जाहीर झाला आहे. सर्वसाधारणसाठी महिलासाठी १२ जागा,(प्रभाग क्रमांक १अ, ३अ, ४अ, ५ब, ६अ, ७अ, ९ब, १०अ, १२अ, १३अ, १४अ, १५ब,) अनुसुचित महिला (प्रभाग क्रमांक २ अ, ८ अ, ११अ,),३जागा, सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी १२ जागा,अनुसुचित जाती खुल्या वर्गासाठी (प्रभाग क्रमांक ९अ, १५ अ) २ जागा, अनुसुचित जमाती खुला वर्गासाठी १ जागा,(प्रभाग क्रमांक ५ अ), जाहीर झाल्या आहेत.
सोमवारी १३ जून २०२२ रोजी कोपरगाव नगरपालिका येथे आरक्षण सोडत काढण्यात आली . आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या १५ ते २१ जून २०२२ या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना १ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सांगितले आहे .
उपजिल्हाधिकारी बालाजी शिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थितीत सोमवारी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सोडत कामी झानेश्वर चाकणे, संजय तिरसे रवींद्र वाल्हेकर, महारुद्र गालट, तुषार नालकर, रोहित सोनवणे, प्रदिप घाडगे, मुकेश मिरीकर, दीपक बडगुजर,प्रशांत उपाध्ये, राजेंद्र इंगळे या पालिका अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले. सोडत कार्यक्रमासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक हजर होते
नगरपालिका निवडणुका पावसाळ्यानंतर ?
दुसरीकडे, ‘जिथे पाऊस तेथे पावसाळ्यानंतर निवडणुका,’ या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेमुळे नेमक्या कधी निवडणुका होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जूनमध्ये पावसाळा असल्याने या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक लगेच होणार की दिवाळीनंतर याची उत्सुकता कायम आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याने नगरपालिका निवडणुक कधी होणार, याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. राज्यात पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केली होती.
या अर्जावर झालेल्या सुनावणीत राज्यात पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या पार्श्वभूमीवर निवडणुक पावसाळ्यानंतर होण्याची दाट शक्यता असली तरीही निवडणुका कधी होणार, उत्सुकता शिगेला पोचली असली तरी याबाबत संभ्रमाचे वातावरण कायम आहे .






