शहर विकासात सर्व समाजाला समान न्याय दिला- ना.आशुतोष काळे

शहर विकासात सर्व समाजाला समान न्याय दिला- ना.आशुतोष काळे

Gave equal justice to all communities in city development – Na. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 14 June, 16.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहरातील सर्वांगीण विकासात सर्व समाजाला समान न्याय दिला असल्याचे प्रतिपादन ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.

कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ७ रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये संरक्षक भिंत बांधणे सभामंडप बांधणे ही कामे त्यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. ना काळे म्हणाले की, कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले, शहरातील रस्त्यासाठी निधी दिला, शहरातील नागरिकांना भविष्यात देखील अशा प्रकारच्या विकासाची अपेक्षा आहे. त्यामुळे जो विश्वास विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखविला तोच विश्वास येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत देखील कोपरगाव शहरातील सुज्ञ मतदार दाखविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, नवाज कुरेशी, कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, आदिसह प्रभागातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते

Leave a Reply

You cannot copy content of this page