विधवा महिलांनाही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे – ना. आशुतोष काळे

विधवा महिलांनाही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे – ना. आशुतोष काळे

Widows should also be treated with respect – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 14 June, 16.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ज्याप्रमाणे सर्व समाज दिव्यांगाकडे सहानुभूतीने पाहतो, त्यांना मदत करण्यासाठी पुढे येतो. त्याप्रमाणे सर्व समाजाने विधवा महिलांच्या बाबतीत देखील हीच भूमिका घेवून विधवा महिलांना देखील सन्मानाची वागणूक दिली पाहिजे असे प्रतिपादन ना. आशुतोष काळे यांनी शहरातील ३०२ दिव्यांग लाभार्थ्यांना ७ लक्ष २७ हजार २०० रुपये अनुदानाचे धनादेश वाटप प्रसंगी केले.

ना. काळे पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. विधवा महिलांचा प्रश्न देखील मोठा अडचणींचा आहे. आजही ग्रामीण भागात विधवांबाबत अनेक अनिष्‍ट रूढी, प्रथा कायम आहेत त्यामुळे सुखाच्या, आनंदाच्या कार्यक्रमात विधवा महिलांना सहभागी होता येत नाही. एकाबाजूला समाज शिक्षित होऊन प्रगती साधत आहे मात्र दुसऱ्या‍ बाजूला विधवांच्या बाबत आजही अनिष्ट प्रथांचे जतन केले जात आहे हे भीषण वास्‍तव आहे. या अनिष्ठ प्रथांमुळे महिलांचा सन्‍मान हिरावून घेतला जात‍ आहे. विधवांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पुरवठा अधिकारी दीपक भिंगारदिवे, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, रमेश गवळी, फकीर कुरेशी, नवाज कुरेशी,  डुकरे, लहू वाघमारे, योगेश गंगवाल, बाळासाहेब कडू, रविंद्र भुजाडे, धनंजय कहार, आकाश डागा, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, राजेंद्र फुलफगर, अक्षय आंग्रे, गणेश बोरुडे आदींसह दिव्यांग बांधव तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page