संजीवनी फार्मसी व आय.एस.एफ. काॅलेज ऑफ  फार्मसी यांच्यात सामंजस्य करार

संजीवनी फार्मसी व आय.एस.एफ. काॅलेज ऑफ  फार्मसी यांच्यात सामंजस्य करार

Sanjeevani Pharmacy and ISF Memorandum of Understanding between the College of Pharmacy

विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्ये  विकसीत करण्यासाठी एक महत्वपुर्ण पाऊलAn important step for students to develop up-to-date knowledge and skills

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 14 June, 17.50
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालय व मोगा (पंजाब) येथिल आय. एस. एफ. काॅलेज ऑफ  फार्मसी या दोन संस्थांमध्ये मोगा येथे नुकताच परस्पर समजोता करार झाला असुन विद्यार्थ्यांना  फार्मसी क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान देण्यासाठी व त्यांच्यात या स्पर्धेच्या काळात खंबीरपणे आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक  असणारे कौशल्ये विकसीत करण्यासाठी संजीवनीने टाकलेले हे महत्वपुर्ण पाऊल आहे, अशी  माहिती संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे समवेत संजीवनी फार्मसीचे  डायरेक्टर डाॅ. किशोर साळुंखे, डाॅ. विपुल पटेल, डाॅ. सरीता पवार, डाॅ. सीमा गोसावी आणि  आय.एस.एफ. काॅलेज ऑफ  फार्मसीचे डायरेक्टर डाॅ. जी. डी. गुप्ता, व्हाईस प्रिन्सिपाल डाॅ. आर. के. नारंग, डाॅ. सिध्दार्थ मेनन व डाॅ. पुजा चावला यांनी परस्पर संस्थांशी   समजोता करार केला.

या करारानुसार आता दोनही संस्थांच्या विद्यार्थ्यांमध्ये  औषधनिर्माणशास्त्र संदर्भातील आधुनिक ज्ञान वृध्दीसाठी परीसंवाद, कार्यशाळा आयोजीत करणे, फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम राबविणे, राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  दर्जाच्या जर्नल्स मध्ये शोध  निबंध सादर करणे, विविध ठिकाणच्या स्पर्धांमध्ये औषधनिर्माण संदर्भात प्रकल्प सादर करणे, विध्यार्थ्यांच्या  हिताच्या दृश्टीने नवनवीन शैक्षणिक  उपक्रम राबविणे, परस्पर संस्थांचे ग्रंथालये, प्रयोगशाळा, साॅफ्टवेअर्स वापरणे तसेच एकमेकांना आवश्यक  तेथे तांत्रिक सहाय्य करणे, अशा  परस्पर समजोत्याचे (मेमोरेंडम ऑफ  अंडरस्टडींग) स्वरूप आहे. संजीवनी बी फार्मसी महाविद्यालयाला शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन अकॅडमिक  ऑटोनॉमस  (शैक्षणिक  स्वायत्ता) संस्थेचा दर्जा प्राप्त झाला असुन विनाअनुदानित वर्गवारीत संजीवनी फार्मसी ही संस्था महाराष्ट्रातील  पहीली आहे तर देशात नववी आहे. यामुळे येथुन पुढे संजीवनीत विद्यार्थ्यांना  आधुनिक औषधनिर्माण शास्त्राचे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रमाची फेररचना करण्यात आली आहे.  वल्र्डक्लास फार्मासिस्टस् घडविण्याच्या दृष्टीने  संजीवनी फार्मसी माहाविद्यालयाने अनेक कंपन्यांशी  यापुर्वी परस्पर समझोता करार केले असुन त्याचा फायदा विद्यार्थ्यांना  होत आहे. आता नव्याने केलेल्या समझोता करारामुळे संजीवनीने एक पुढचे पाऊल टाकले आहे. या सर्व बाबींमुळेच संजीवनी नवनवीन किर्तीमान स्थापित करीत आहे.     

Leave a Reply

You cannot copy content of this page