आजचा प्रभाग पाच म्हणजे समस्यानगरीच – ना. आशुतोष काळे
Today’s ward five is the problem – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 18 June, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : ‘नामदार आपल्या दारी’या कार्यक्रमात गुरूवारी जुना प्रभाग क्रमांक ४ व सध्याचा ५ या प्रभागातील नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला तो पाहता या प्रभागाला समस्यानगरीच म्हणावे लागेल अशी उपहासात्मक टिका ना. आशुतोष काळे यांनी केली.
ना काळे म्हणाले की, गेल्या काही वर्षापासून कोपरगाव शहराच्या विकासाची दुरावस्था व पाण्यासाठी चे दुर्भिक्ष जवळून पाहिली आहे पुण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महा विकास आघाडी सरकारकडून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी ला आहे. मात्र अनेक प्रभागातील नागरिक मुलभूत विकासापासून आजही वंचित आहेत. प्रभाग क्र. ५ हा प्रभाग विकासाच्या बाबतीत किती मागे आहे याची प्रचीती येते. हि परिस्थिती बदलविण्यासाठी व प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी दिलेल्या उमेदवारांना निवडून द्या तुमच्या विकासाच्या समस्या निश्चितपणे मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी दिला . तसेच प्रत्यक्ष पाहणी करून त्या समस्या सोडवण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, डॉ. गायत्री कांडेकर, सुनील गंगूले, सौ. रेखा जगताप, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, मेहमूद सय्यद, रमेश गवळी, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, बाळासाहेब रुईकर, राजेंद्र खैनरार, इम्तियाज अत्तार, मुकुंद इंगळे, राजेंद्र आभाळे, राजेंद्र जोशी आदी मान्यवरांसह प्रभागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.