कोल्ब्रो ग्रुप मध्ये संजीवनी पाॅलीटेक्निकच्या १७ स्थापत्य अभियंत्यांची निवड – अमित कोल्हे
Selection of 17 Civil Engineers of Sanjeevani Polytechnic in Colbro Group – Amit Kolhe
१९ व्या वर्षीच विद्यार्थी होताय कमावतेHe becomes a student only at the age of 19 and earns
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 25 June, 17.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कोल्ब्रो ग्रुप या कंपनीने सिव्हिल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील १७ नवोदित अभियंत्यांची निकाला आधीच आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड करून नेमणुकीचे पत्र दिल्याने हे विद्यार्थी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी कमावते होत असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की कोल्ब्रो ग्रुप ही एक प्रकल्प व्यवस्थापन कंपनी आहे. या कंपनीद्वारे महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदा व महानगारपालिकांसाठी जीआयएस आधारीत मालमत्ता कर मूल्यांकण सर्वेक्षण आणि मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणालीवर काम केल्या जाते.
निवडलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये मयुर संजय पवार, शुभम दहिफळ, अदित्य राज, यशराज धनेधर, धिरज कुमार, मेघनाथ कुमार, अमित कुमार, सोहन कुमार, विशाल शर्मा, सोनु कुमार, सोनुकुमार ठाकुर, रितेश कुमार सिंघ, रवितोश कुमार, प्रथमेश घुगरकर, राहीत कौतिक घोगडे, अविष्कार गायकवाड आणि विकास अबासाहेब मिंद यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी यांनी विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. व सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद , विभाग प्रमुख प्रा. योगेश जगताप, प्रा. प्रताप आहेर उपस्थित होते.