उपेक्षितांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा -स्नेहलता कोल्हे

उपेक्षितांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा -स्नेहलता कोल्हे

Efforts should be made to provide the benefits of government health schemes to the neglected – Snehalta Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 25 June, 17.40
By
राजेंद्र सालकर

 कोपरगांव : आरोग्य ही जीवनाची गुरूकिल्ली आहे, आज प्रत्येकाच्या जीवनशैलीत ताण तणावामुळे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यावी, उपेक्षीत घटकासाठीच्या शासनस्तरावर असंख्य योजना आहे त्याची अंमलबजावणी तंतोतंत होण्यासाठी सर्व पदाधिका-यांनी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत असे आवाहन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.

  संजीवनी युवा प्रतिष्ठान, नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर, मणिशंकर आय हॉस्पीटल,राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पिटल, आत्मा मालिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शहरातील गांधीनगर भागात मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे उदघाटन अशोक लकारे, शिवाजी खांडेकर यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.      

 प्रारंभी डॉ. योगेश बत्रा यांनी प्रास्ताविकात डोळ्यांचे आरोग्य आणि आजार याविषयी माहिती दिली. श्री. शिवाजी खांडेकर म्हणाले की, मोतीबिंदू व नेत्र तपासणी शिबिरे ही गोरगरीब रुग्णांसाठी मोठी उपलब्धी आहे संजीवनी चे कार्य अलौकिक आहे.             

याप्रसंगी  अमित निकम, महेश गायकवाड, चेतन गवळी, दिपक गवळी, सिध्दार्थ साठे, शक्ति परदेशी, सिध्दु भाटीया, सतिश रानोडे, आण्णा खरोटे, राजेंद्र गंगुले, किशोर झाल्टे, संजय सपकाळ, सागर कोपरे, डॉ. शहानवाज शहा, ग. भा. शांता साळुंके, ग. भा. मथुरा शिन्दे, सौ. रेखा कहार, शैनाज दादा शेख, गणेश गायकवाड, पियुश पापडीवाल, रावसाहेब साळुंके, प्रभुदास पाखरे, राजु वाणी, स्वराज लकारे, संजय शेजवळ, अमित आढाव, सुभाष नाईक, रशिद शेख, काशिम शेख, बनेमियाॅ शेख, यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page