धारणगांव येथे सोयाबीन उत्पादन वाढ कार्यशाळा संपन्न.
Soybean production increase workshop held at Dharangaon.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 25 June, 18.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील धारणगांव येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र जाधव यांच्या शेतावर कृषि विभाग कोपरगांव व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत सोयाबिन उत्पादन वाढीच्या पंचसुत्रीबाबत कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
प्रारंभी तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी तालुक्यात सोयाबीन उत्पादकता वाढ प्रकल्प राबविण्यांत येत असुन शेतक-यांच्या अडी अडचणी दुर करून उत्पादन वाढीसाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन दिले.
तेलबिया संशोधन केंद्राचे कृषितज्ञ पोपटराव खंडागळे हे भारत देशाला स्वातंत्र मिळुन ७५ वर्षे पुर्ण झाल्याबददल राज्यात कृषी ज्ञान विस्ताराचा जागर स्वातंत्राचा उपक्रमांतर्गत कार्यशाळा घेवुन कमी खर्चात अधिकचे उत्पादन कसे मिळवायाचे याबाबत जनजागृती करीत आहेत त्या अंतर्गत धारणगांव येथील शेतक-यांना त्यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, रोग व कीड एकात्मीक व्यवस्थापन याबाबत माहिती देत शेतक-यांच्या शंकांचे निरसन केले.
सरपंच नानासाहेब चौधरी यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रयोगशील शेतकरी योगेश पानसरे, राहुल चौधरी, रामदास रणशुर, निखील जाधव, सोपानराव वहाडणे, प्रकाश देवकर आदि उपस्थित होते. कृषी सहायक संगिता सोळसे यांनी सुत्रसंचलन केले तर कृषि पर्यवेक्षक राजेंद्र तुंभारे यांनी आभार मानले.