बंडखोर आमदारांना ‘अलीबाबा चाळीस चोरांची’ उपमा देत शिवसेनेचा हल्लाबोल !

बंडखोर आमदारांना ‘अलीबाबा चाळीस चोरांची’ उपमा देत शिवसेनेचा हल्लाबोल !

Shiv Sena’s attack on rebel MLAs as ‘Alibaba forty thieves’!

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 27 June, 18.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: महाराष्ट्र राज्यातील बंडखोर आमदार अलीबाबा चाळीस चोर असून फक्त ईडीच्या भीतीने भाजपाच्या तालावर नाचत असल्याची टीका उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांनी केली. ही सर्व चोर मंडळी तिकडे गुवाहाटीमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महाराष्ट्रद्रोहाचे प्रदर्शन संपूर्ण देशाला आणि जगाला करीत आहेत. मात्र कोपरगावचा शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेसोबतच राहील असेही ते म्हणाले,

शिवसेनेने ज्यांना शिवसैनिक ते मंत्री पदापर्यंत पोहचवले. याच लोकांनी स्वतःची सत्तास्थाने निर्माण केली. आणि आज अचानक हिंदुत्वाच्या नावाखाली ते बाहेर पडले हा पक्षाशी केलेला मोठा विश्वासघात असून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून अलिबाबा व चाळीस चोर या घोषणा देऊन या सर्व बंडखोर आमदार व मंत्र्यांचा निषेध करण्यात आला.

तालुकाप्रमुख ठाकरे यांनी वाचमेन मंत्री, रिक्षावाला मंत्री, टपरीवाला मंत्री हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते. फक्त ईडीच्या भीतीने गेल्याची टीका केली.

माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी २०१४ व २०१९ मध्ये एकनाथ शिंदे राजीनामा देत होते भाजपा बरोबर राहणार नाही, आता भाजप कसे चालते, ज्या बापाने मोठे केले त्याच बापाला तुम्ही विसरले. तुमच्या मतदारसंघातील लोक मग का रस्त्यावर आले अशी टीका केली.

सनी वाघ यांनी शिवसेना हा आमचा संस्कार आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक आम्ही कधी साहेबांना सोडणार नाही.

असलम शेख यांनी अब्दुल सत्तार यांचे कोणते हिंदुत्व जागे झाले. कोपरगावचे नाहीतर महाराष्ट्रातला मुस्लिम समाज उद्धव  ठाकरे यांच्याच  बरोबर राहील.

सपना मोरे व बाळासाहेब जाधव यांनीही सडकून टीका केली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, सनी वाघ, नगरसेवक अनिल आव्हाड, नगरसेविका सपना मोरे,राखी विसपुते, बाळासाहेब जाधव, रावसाहेब थोरात, मनोज कपोते, प्रविण शिंदे,उपतालुकाप्रमुख बाबासाहेब बढे, राजेंद्र नाजगड, विजय ताजणे, राहुल होन ,शिवाजी रोहमारे, बालाजी गोर्डे, कृष्णा अहिरे,चंद्रकांत भिंगारे , सागर फडे,रवींद्र कथले, गणेश जाधव, सिद्धार्थ शेळके,मुन्ना मंन्सुरी, शिवनारायण परदेशी, योगेश मोरे, भूषण पाटणकर ,मच्छिंद्र नवले, राजेंद्र धरणे, श्रीकांत बागल ,देविदास बिडवे, विकी मोरे ,वसीम चोपदार, अभिषेक सारंगधर, संतोष जाधव,अमोल शेलार दीपक कराळे, रफिक शेख सहभागी होते. 

आभार माजी शहर प्रमुख असलम शेख यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page