संजीवनी एमबीए मध्ये ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम- अमित कोल्हे

संजीवनी एमबीए मध्ये ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम- अमित कोल्हे

Agri Business Management Course in Sanjeevani MBA- Amit Kolhe

  संजीवनीला ऑटोनॉमस  दर्जाचा फायदा The benefit of autonomous quality to resuscitation

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 June, 16.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्स  संचलीत एमबीए महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासुन ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट (शेती  व्यवसाय व्यवस्थापन) हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असुन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठाने संजीवनी एमबीए ही (ऑटोनॉमस ) स्वायत्त संस्था असल्याने तशी  परवानगीही दिली आहे.

माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इंस्टिट्युट्सचे  संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांची नेहमी शेतकऱ्यांच्या  प्रगतीसाठी उपक्रम राबविले पाहीजे, अशी  तळमळ असायची, याच अनुषंगाने  हा नव्याने अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असल्याची माहिती संजीवी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की भारत हा कृषी  प्रधान देश  आहे. शेतकरी  कधीच नफा-तोट्याची  चिंता न करता प्रामाणिकपणे शेतीत कष्ट  करीत असतो.  बळी राजास अनेकदा आसमानी-सुलतानी संकटांना सामोरे जावे लागते व अनेकदा काबाड कष्ट  करूनही हाती काहीच लागत नाही. परंतु संभाव्य सर्व संकटांचा विचार करून शेती नियोजन केले तर शेती मधुन चागला लाभ होवु शकतो, हे युरोपियन देशांनी  दाखवुन दिले आहे. महाराष्ट्रात  सुध्दा आधुनिक शेती पध्दतीने शेती करताना त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास शेती व्यवसायातुन अधिकचा फायदा होवु शकतो. यासाठी शेती व्यवसायाचे व्यवस्थापन युवकांनी आत्मसात केले पाहीजे, या हेतुने संजीवनी एमबीए महाविद्यालयात नव्याने अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाची पुर्व तयारी म्हणुन संजीवनी एमबीएने शेती  क्षेत्रात आघाडीवर असलेल्या प्रभात ग्रुप, किसान कनेक्ट, आस्था बायोकेअर,राॅयलॲग्रो व  अश्वमेध ॲग्रो या कंपन्यांशी  समझोता करार केले असुन संजीवनी एमबीए मध्ये ॲग्रीबिझिनेस मॅनेजमेंट सेंटरची स्थापनाही करण्यात आली आहे. या कंपन्यांमार्फत ॲग्री बिझिनेस मॅनेजमेंट हा एमबीए अंतर्गत कोर्स करणाऱ्या विध्यार्थ्यांना इंटर्नशिप  देवुन नोकऱ्याही  देण्यात येणार आहे. संजीवनी एमबीए ने शेती उद्योग व्यवस्थानाचे शिक्षण  देण्याचा निर्णय घेवुन एक क्रांतीकारी पावुल टाकले आहे. या शिक्षणाच्या माध्यमातुन भविष्यात  नवयुवक-युवती शेती पुरक व्यवसाय सुरू करू शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या विविध सुविधा, अनुदाने यांचा लाभही घेवु शकतील, असे श्री कोल्हे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page