कोपरगाव शहराची हद्दवाढ झाली मग चौत्तीशे नळपट्टी कशी ?

कोपरगाव शहराची हद्दवाढ झाली मग चौत्तीशे नळपट्टी कशी ?

Kopargaon city boundary has been extended, so how about four hundred pipes?

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 28 June, 16.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहरालगत असलेला कोपरगाव ग्रामीण भाग हा शहर हद्दवाढीमुळे कोपरगाव नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट झाला झाला असतानाही ३ हजार ४०० रूपये इतकी नळपट्टी कशी ? असा सवाल कर्मवीर नगर येथील उमाकांत एकनाथ धुमाळ यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या पत्रकातून केला आहे.

मंगळवारी (२८जुन) दुपारी १२ वाजता नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन उमाकांत धुमाळ यांनी आपली नळपट्टी नियमित करून मिळावी या बाबतचे निवेदन दिले.

या निवेदनातून आपली बाजू मांडताना धुमाळ यांनी म्हटले आहे की, तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराची हद्दवाढ होऊन त्रिशंकू असलेला कोपरगाव ग्रामीण भाग कोपरगाव शहरामध्ये समाविष्ट झाला असताना आजही सन २०२२-२३ ची नळपट्टी पूर्वीप्रमाणेच ग्रामीण भागाप्रमाणे दुप्पट पाणीपट्टी कशी आकारली जात आहे.?  सदर नळपट्टी ही नियमित करून मिळावी ती मी भरण्यास तयार असल्याचे धुमाळ यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page