कोपरगावच्या शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने रेखाटली उद्धव ठाकरे यांची तस्वीर

कोपरगावच्या शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने रेखाटली उद्धव ठाकरे यांची तस्वीर

Shiv Sainik of Kopargaon drew a picture of Uddhav Thackeray with his own blood

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 2 July, 16.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर निस्सीम आणि प्राणापलीकडे प्रेम करणारे अनेक कट्टर शिवसैनिक आहेत. कोपरगावचे गगन हाडा हेदेखील त्यापैकी एक असून,ज्यावेळी  सत्तेसाठी बंडखोर आमदारांचे नेते  एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर  तिसावे मुख्यमंत्री म्हणून   मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते  त्याच वेळेस इकडे मातोश्रीवर एक शिवसैनिक रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साहेब आम्ही तुमच्याबरोबर असल्याचा विश्वास देणारी स्वतःच्या रक्ताने रेखाटलेली  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची तस्वीर त्यांना देत होता. यावेळी सामान्य शिवसैनिकाच्या प्रेमामुळे उद्धव ठाकरे हे अतिशय भावुक झाले होते.

सध्या मिडिया आणि सोशल मीडियावर ‘ शिवसेना राजकीय घडामोडींचा’  बोलबाला आहे. सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक नेटकऱ्यांनी अनेक भावनात्मक पोस्ट शेअर केल्या आहेत. कोणी या  घटनांविषयी त्याना माहित असलेल्या गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या आहेत. तर कोणी या बंडखोर आमदाराबद्दलची चीड व्यक्त  करताना दिसत आहे. एकीकडे  ज्यांना  शिवसेना व ठाकरे परिवाराने  मोठे केले होते  ते बंडखोर होऊन  सत्तेसाठी दुसरीकडे जाऊन बसले.या सगळ्यात कोपरगावच्या एका शिवसैनिक  चाहतीने चक्क त्याच्या  रक्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तस्वीर रेखाटली, त्यात त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साहेब आम्ही तुमच्याबरोबर  असल्याचे वचन दिले आहे. यावेळी मातोश्री येथे गगन हाडा यांच्या समवेत भावेश थोरात,महेश निरभवणे, मजर मणियार हे उपस्थित होते. 
 
कोपरगाव वाल्मीक समाजाचे कार्यकर्ते व शहर शिवसेनेचे माजी  उपशहर प्रमुख गगन हाडा हे  माजी शहर प्रमुख असलम शेख व भरत मोरे यांचे निकटवर्ती  समजले जातात. गगन हाडा  यांच्या या भावनिक उपक्रमाचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख  शिवाजी ठाकरे, माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव, मुन्ना मन्सुरी  यांचेसह  कोपरगावात सर्वत्र  स्वागत व अभिनंदन होत  आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page