शिर्डी -सिन्नर महामार्गावर देर्डे शिवारात डिझेल चोरी

शिर्डी -सिन्नर महामार्गावर देर्डे शिवारात डिझेल चोरी

Diesel theft in Derde Shivara on Shirdi-Sinnar highway

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 2 July, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : शिर्डी -सिन्नर महामार्गावर देर्डे शिवारात उभ्या एक्सा व्हिक्टर (कोबेलको २२०) या वाहनांतून चोरट्यांनी १५० लिटर साडेचौदा हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी करत पोबारा केला. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिर्डी -सिन्नर महामार्गावर देर्डे शिवारात शनिवारी रात्री तीन ते पाच वाजेच्या दरम्यान ओम साई ढाब्याजवळ उभ्या असलेल्या रस्त्याच्या कामावरील एक्सा व्हिक्टर (कोबेलको २२०) या वाहनांतून बोलेरो गाडीतून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी टाकीला नळी लावून ड्रम मध्ये भरून चोरट्यांनी १५० लिटर साडेचौदा हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी केली असल्याची फिर्याद सिक्युरिटी सुपरवायझर गोरक्षनाथ पोपट फरताळे यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसांत दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चव्हाण हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page