संजीवनी युवा प्रतिष्ठान डोळ्याच्या आजारासंबंधी जनजागृती करणार -विवेक कोल्हे. 

संजीवनी युवा प्रतिष्ठान डोळ्याच्या आजारासंबंधी जनजागृती करणार -विवेक कोल्हे.

Sanjeevani Yuva Pratishthan will raise awareness about eye diseases – Vivek Kolhe.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 2 July, 18.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : ५० टक्क्यापेक्षा जास्त रूग्ण मोतिबिंदु शस्त्रकिया करून घेण्यास विलंब लावतात असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी बाजारथळे येथील मोफत नेत्र शिबिराच्या प्रसंगी केले . डोळ्याच्या आजारासंबंधी जनजागृती करण्याचे संजीवनी युवा प्रतिष्ठानने ठरविले आहे असेही त्यांनी सांगितले.

डॉ. योगेश बत्रा यांनी प्रास्ताविक केले.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, मोतीबिंदू सर्वेक्षण अहवालानुसार ३५-४० वयोगटात मोतिबिंदुची लक्षणे मोठया प्रमाणांत आढळतात. केवळ शस्त्रकियेचा खर्च परवडत नाही म्हणून २४ ते ३० टक्के रूग्ण शस्त्रक्रियाच करून घेत नाहीत, वैद्यकिय सल्ला तात्काळ घेऊन डोळयांची दृष्टी वाचवता येते. नीलवसंत मेडीकल फाउंडेशन व संशोधन संस्था नाशिक तसेच मणिशंकर आय हॉस्पीटल यांच्या सहकार्याने व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिलेला वसा यातून संजिवनी युवा प्रतिष्ठान २०११ पासुन यासंदर्भात जनजागृती करत आहे            

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष . संजय सातभाई, दत्ता काले,. अतुल काले,  वैभव आढाव, नवनाथ उदावंत, बाळासाहेब राऊत, सुधाकर क्षिरसागर,  महेश खडामकर, विजय भडकवाडे, वैभव महापुरे, कांतीलाल जोशी, किरण सुर्यवंशी, महावीर काले, देवीदास बागुल, मुसा शेख, रहिम शेख, मुकुंद उदावंत, गजानन कोतकर, चंद्रकांत वाघमारे, उध्दव विसपुते, संजय राठोड, दत्ता कोळपकर, बाबुराव पहिलवान, सागर राऊत, बाळासाहेब नरोडे, किरण सुर्यवंशी, आशिफभाई पठाण, रवींद्र रोहमारे, संतोष साबळे, सतिश रानोडे, सोमनाथ अहिरे, कैलास नागरे, दिनेश कांबळे, स्वप्निल निखाडे, आबा नरोडे, संजय तुपसैदर, प्रभुदास पाखरे, सौ. सुलभा कोळपकर, सौ. उषा सोनवणे, सौ. शबाना शेख, सौ. लता मंडलिक, सौ. कुसुम इंगळे, सौ. ताराबाई सोनवणे, सौ. मुमताज शेख,. आकाश खैरे, पप्पू पडियार, रंजन जाधव, सचिन उदावंत, विनायक बाविस्कर, साजिद पठाण, चंद्रकांत उदावंत यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page