अखेर पाच नंबर साठवण तलावाच्या कामाचा कार्यारंभ आदेश
Finally, the commencement order for the work of storage pond number five
लक्ष्मी कन्स्ट्रक्शन गुजरात कंपनीला काम Lakshmi Construction Gujarat Work for the company
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 6 July, 12.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : नगरपालिकेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या १३१.२४ कोटी कामासाठी लक्ष्मी कंपनी गुजरात या कंपनीला कार्यारंभ आदेश देखील देण्यात आल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी मंगळवारी (६जून) रोजी रात्री ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सन २०१९ च्या निवडणुकीत आपण कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाबाबत दिलेला शब्द पूर्ण केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याबद्दल बोलताना ना. आशुतोष काळे म्हणाले, सत्ताधारी पक्षाचा आमदार झाल्यानंतर पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक काम गायत्री कंपनीकडून करून घेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सहकार्यातून महाविकास आघाडी कडून साठवण तलावासह वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधीस मंजुरी मिळविण्यात यश मिळवले. नगरपालिकेच्या येसगाव येथील २२ एकर जागेत पाच नंबर साठवण तलाव विकसित केले जाणार आहे.नागरिक ज्या क्षणाची वाट पाहत होते तो आनंदाचा क्षण शहरातील नागरिकांना देऊ शकलो याचे मोठे समाधान आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे ते शेवटी म्हणाले.
यावेळी धरमचंद बागरेचा, सुनील गंगुले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, नवाज कुरेशी, सुनील शिलेदार, कृष्णा आढाव, रमेश गवळी, अॅड. विद्यासागर शिंदे, संदीप कपिले, दिनकर खरे, वाल्मीक लाहीरे, शैलेश साबळे, राजेंद्र वाघचौरे, अशोक आव्हाटे, राहुल देवळालीकर, गणेश बोरुडे, सचिन गवारे, इम्तियाज अत्तार, संदीप सावतडकर,अमीन शेख, फकीर कुरेशी, धनंजय कहार. शुभम लासुरे, निखिल डांगे, डॉ. तुषार गलांडे, भाऊसाहेब साठे, बाळासाहेब रुईकर, अंबादास वडांगळे, सचिन परदेशी, नारायण लांडगे, सुनील बोरा, प्रकाश दुशिंग, संतोष चव्हाणके कार्तिक सरदार, जावेद शेख, एकनाथ गंगुले, किरण बागुल, शफिक शेख, राजेंद्र आभाळे, सोमनाथ आढाव, राजेंद्र बोरावके, योगेश वाणी आदी उपस्थित होते.





