संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सहा विद्यार्थ्यांची डीएक्ससी टेक्नालाॅजीमध्ये निवड- अमित कोल्हे

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सहा विद्यार्थ्यांची डीएक्ससी टेक्नालाॅजीमध्ये निवड- अमित कोल्हे

Six students of Sanjeevani Polytechnic selected in DXC Technology – Amit Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 6 July, 12.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने डीएक्ससी टेक्नालाॅजी या आय टी क्षेत्रात ७० पेक्षा अधिक देशात  सेवा पुरविणाऱ्या  कंपनीने संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सहा विद्यार्थ्यांची आकर्षक  पगारावर नोकरीसाठी निवड केली अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की प्रत्येक पालक आपल्या पाल्याने सध्याच्या स्पर्धात्मक युगात नोकरी मिळवुन स्थिर स्थावर व्हावे, यासाठी आपली आर्थिक हतबलता पाल्यांच्या शैक्षणिक  प्रवाहामध्ये आडवी येणार नाही, याचीही पालक काळजी घेत असतात. संजीवनीमध्ये औद्योगीक जगताला अभिप्रेत असलेले आधुनिक तंत्र शिक्षण संजीवनीमध्ये दिले जाते. यामुळे अलिकडेच डीएक्ससी टेक्नालाॅजीने निवड केलेल्या नवोदित अभियंत्यांमध्ये मानसी प्रविण दरांगे, कोमल बाळासाहेब शिरसाठ, दिक्षा अनिल सरोदे, कल्याणी जयराम क्षिरसागर, वैष्णवी दिपक खिंडारे व अभिषेक  अजित धस यांचा समावेश  आहे. यात  मुलींची संख्या उल्लेखनिय असते. आज शेकडो विध्यार्थी स्वावलंबी होत आहे, ही खऱ्या  अर्थाने कै. कोल्हे यांना आदरांजली आहे.

संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व नवोदित अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. आय. के. सय्यद व विभाग प्रमुख प्रा. गणेश  जोर्वेकर उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page