कोटयावधीचा गंडा घालणारा ठग कोपरगाव पोलिसांच्या ताब्यात ; तीन दिवसांची पोलीस कोठडी
Kopargaon police nab thug Three days in police custody
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 3 July, 19.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव: कोपरगाव, राहाता तसेच औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना आणि बांधकाम व्यावसिक यांना कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून कोट्यावधीची माया जमा करून मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांकडून कोपरगाव पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतला असून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच जुलै तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील गरजू लोकांना हेरून त्यांचा विश्वास संपादन केला व कोट्यावधीची माया गोळा करुन लोकांना करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या शिवानंद दादु कुंभार रा. इचलकरंजी कोल्हापूर यास प्रथम बेळगाव कर्नाटक पोलिसांनी अटक केली, त्याचा ताबा कोपरगाव पोलिसांनी घेवून त्यास तुरूंगात टाकले.
कोपरगाव तालुक्यातही शिर्डी येथील शैक्षणिक संस्थेशी संबंधित इसमाने करोडो रूपये उकळले आहे. कोपरगाव पोलिसांना तो आठ महिन्यांपासून हवा होता. त्यास अटक झाल्यानंतर फसवणूक झालेली मंडळी पुढे येत आहेत.
मट्याच्या बेळगावच्या पोलिसांनी स्वस्तात सिमेंट व स्टिल घ्या, स्टील सिमेंट नको असेल तर रोख रक्कम गुंतवा आणि काही महिन्यातच दुप्पट परतावा घ्या, असं आमिष ठिक ठिकाणी शिवानंदने नागरिकांना दाखवलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यांनी शिवानंद कुंभार यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला.
आरोपी शिवानंद कुंभारला या प्रकरणातील तपासाठी बेळगाव पोलीसांकडून शनिवारी कोपरगाव पोलीसांनी ताब्यात घेवून कोपरगाव न्यायालयात हजर केले. आरोपीला न्यायालयाने ५ जुलै पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवानंद कुंभार याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी अनेकांची फसवणूक झाली आहे असे असले तरीही पुढे येण्यास कोणी तयार नाही या ठकाविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात केवळ एकच गुन्हा दाखल आहे .
या शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे तपास करीत आहेत