गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन ६३१० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले 

गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन ६३१० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले

6310 cusecs of water released from Godavari river from Nandur Madhyameshwar dam

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 10July, 18.20
By
राजेंद्र सालकर

 कोपरगांव : शनिवारी इगतपुरी  नाशिक भागात चांगला पाउस झाल्याने गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर  बंधा-यातुन रविवारी दुपारी बारा वाजता ६३१०  क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. गेल्या महिनाभरात या बंधा-यातुन ५ हजार १५८ क्युसेक्स पाणी गोदावरीतुन वाहिले आहे. आषाढी एकादशी निमीत्त भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधता आली आहे.

नाशिक ईंगतपुरी भागात ९ जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे आजपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची आहे.         

 दारणा  ३४ (३७१) मुकणे २३३, वाकी ४९ (५१२) भाम १४६ (६९०) भावली ८०(११८१) वालदेवी ५० (१००) गंगापुर १४१ (५२६) कiश्यपी १५९ (३६६) गौतमी १०२ (३५९) कडवा ३४ (२७१) नाशिक ५१ (२६१) घोटी ० (२१) त्र्यंबकेश्वर ९४ (४८८) ईगतपुरी २४२ (११३४) नांदूर मध्यमेश्वर १९ (१४५) ब्राम्हणगांव ६० (१३०) कोपरगाव १४ (१०३) पढेगांव १६ (११६) सोमठाणा १७ (२४४) कोळगांव २० (२४४) सोनेवाडी १२ (१३८) शिर्डी ६ (१२२) राहाता १६ (२१७) रांजणगाव खुर्द ९ (१४५) चितळी १३ (१५७) याप्रमाणे पाउस झाला आहे.     

 तर धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनफुटात, कंसातील आकडे आजपर्यंत साठलल्या एकुण पाण्यiची आहे. दारणा (४३०७) मुकणे (३५२८) वाकी (५६) भाम  (६९०) भावली  (८४२) वालदेवी (१३७) गंगापुर (२५५१) काश्यपी  (२५३) पालखेड १९३, गौतमी (६०५) कडवा (८९४)            

Leave a Reply

You cannot copy content of this page