आपत्ती परिस्थितीत गरजेच्या व आवश्यक सर्व तयारी करा – ना. आशुतोष काळे

आपत्ती परिस्थितीत गरजेच्या व आवश्यक सर्व तयारी करा – ना. आशुतोष काळे

In case of disaster, make all the necessary preparations – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 12July, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : येत्या चार दिवसात अजून पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. नांदूर मधमेश्वर मधून गोदावरी नदीत सध्या
७८ हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग व येणारा पाऊस यामुळे निर्माण होणाऱ्या पूरजन्य आपत्तीत योग्य कारवाई करा, करू, पाहू, सुरू आहे अशी रुटीन उत्तरे देऊ नका, अशी सक्त ताकीद ना. आशुतोष काळे यांनी मंगळवारी (१२जुलै) तहसीलदार विजय बोरडे यांच्या उपस्थितीत झालेल्या ऑनलाईन आपत्ती आढावा बैठकीत उपस्थित विभाग अधिकाऱ्यांना दिल्या.

आपत्ती बैठकीत चर्चा करताना तहसीलदार विजय बोरुडे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप,

यावेळी ना. आशुतोष काळे यांनी गोदावरी नदीतून किती पाणी विसर्ग होत आहे? नांदूर मधमेश्वर मधून गोदावरी नदीत होणारा विसर्ग व रस्त्यात मिळणारे नदी नाले यातून वाढलेले पाणी याची मोजमाप कसे केले जाते ? स्थलांतर शाळा भोजन व्यवस्था केली का? मागच्या वर्षी ब्राह्मणगाव येथे ढगफुटी सदृश्यपरिस्थिती निर्माण झाली होती त्याबाबत काही व्यवस्था केली आहे का काटे अडथळे पाहून घ्या सर्व क्लिअर करा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत ठेवून नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत
पुरवा, खंदकनाला बॅकवॉटर, खडकीनाला यांची साफसफाई करा, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साचणारे पाणी, मच्छर फवारणी, ब्लिचिंग पावडर टाकणे,त्याबाबत काळजी घ्या रस्त्यातील विजेचे वाकडेतिकडे पडलेले पोट दुरुस्त करा बोट सज्ज ठेवा चे अनेक प्रश्न विचारून याबाबतच्या सर्व कारवाई व व्यवस्था चोख झाली आहे का? याबाबत अधिकाऱ्यांच्या विचारून खात्री करून घेतली व काही कसर राहिल्यास ती पूर्ण करण्याचे आदेश दिले, लोकांना, नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जातीने लक्ष देऊन काळजी घ्या, अशा सूचना त्यांनी शेवटी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायत्री कांडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दिलीप गाडे, सहाय्यक अभियंता सचिन ससाणे, कनिष्ठ अभियंता आर.बी. चौधरी, ग्रामीण रुग्णालय आरोग्य सहाय्यक एस.ए. जोशी, कोपरगाव नगरपरिषद उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, आरोग्य विभाग प्रमुख सुनील आरण, जल निस्सारण विभागाचे अंबादास पंडोरे, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वाल्मिक लोखंडे, सहाय्यक अभियंता कल्याणी शुक्ल, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, संतोष चवंडके, विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, अजिज शेख, दिनकर खरे आदी उपस्थित होते.

चौकट :- आपत्ती परिस्थितीत मोह आवरून आतेताईपणा टाळा, सोबत असलेल्यांची ही काळजी घ्यावी. शरीराला कुठेही इजा होणार नाही व कोणाच्याही जीवितास धोका निर्माण होणार नाही याबाबत विशेष काळजी घ्यावी – ना. आशुतोष काळे

 

Leave a Reply

You cannot copy content of this page