कोपरगाव : वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; चांदेकसारे येथील घटना,
Kopargaon: Elderly man commits suicide by strangulation; Incident at Chandeksare,
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 12July, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील चांदेकसारे येथील एका वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी ( ता. १२ ) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
सुधाकर रामजी खंडेझोड( वय ६२ ) असे आत्महत्या केलेल्या वृध्दांचे नाव आहे. तर, सुधाकर खंडेझोड हे घराच्या अँगल ला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
याप्रकरणी मयताचा मोठा भाऊ प्रभाकर खंडेझोड यांनी कोपरगाव ग्रामीण पोलिसांमध्ये खबर दिली असून सदर खबरी वरून ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.