कोपरगाव – सावळीविहीर फाटा रस्ता लवकरच  – ना.आशुतोष काळे

कोपरगाव – सावळीविहीर फाटा रस्ता लवकरच  – ना.आशुतोष काळे

Kopargaon – Sawalivihir Phata Road Soon – No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव-सावळीविहीर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतून या रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीस लवकरच तांत्रिक मान्यता मिळून या कामाला लवकरच सुरुवात होईल असा आशावाद ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिर्डी देवस्थान असल्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या राज्यातील व परराज्यातील साईभक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.

याप्रकरणी ना. आशुतोष काळे यांनी दिल्ली येथे जावून केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेवून या मार्गासाठी निधी मिळावा अशी मागणी केली होती. त्याबाबत ना.गडकरी यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादातून या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाली आहे. प्राथमिक स्वरूपातील तांत्रिक मान्यतेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय मान्यता मिळविल्या आहे. १९ एप्रिल रोजी त्याबाबत १७८ कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीसाठी तांत्रिक मंजूरी मिळावी यासाठी केंद्रीय मंत्रालय स्तरावर लवकरच मान्यता मिळणार असून अंतरिम मान्यता मिळताच या रस्त्याच्या कामास सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे वेळोवेळी मोठे सहकार्य व मदत मिळाली असल्याचे ना. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.                       

Leave a Reply

You cannot copy content of this page