कोपरगावात साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
Organization of Sai Charitra Parayan ceremony at Kopargaon
सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह असतोDevotees have great enthusiasm for this festival which lasts for nine consecutive days
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 17.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : श्रावण महिन्यानिमित्त कोपरगाव शहरात साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते . दरवर्षी मुंबादेवी तरुण मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याचे १७ वे वर्ष आहे.
श्रावण महीना सुरु झाला की, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची सुरवात होते. कोपरगाव शहरात दरवर्षीच्या मुंबादेवी पालखी सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर साईचरित्र पारायण सोहळा महत्वाचा उत्सव असतो. गुरुवार ४ ऑगस्ट ते शुक्रवार १२ ऑगस्ट असा नऊ दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यास ४ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री योगेश व सौ. पद्मावती बागुल यांच्या हस्ते पारायण सोहळ्याचा संकल्प करण्यात येणार आहे. यानंतर श्री संत जनार्दन स्वामी समाधीस्थान मठाधिपती महंत रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या भक्तीभावाने सुरवात होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण समाप्तीच्या दिवशी श्री साई चरित्र ग्रंथ दिंडी शोभा मिरवणूक हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये आहे. ज्यांना या पारायण सोहळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे मुंबादेवी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याकडे नोंदवावीत असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
पारायण सोहळ्याचे व्यवस्थापन संजय मंडलिक व आरती व्यवस्थापन जयंत विसपुते यांच्याकडे आहे. तर महाप्रसादाचे नियोजन राहुल आढाव, दत्तात्रय उदावंत, ज्ञानेश्वर गोसावी, विक्रमादित्य उर्फ पप्पू सातभाई मंडळ हे करणार आहेत. पारायण सोहळ्याकामी प्रतिभा कुलकर्णी, रश्मी आढाव, पद्मावती बागुल, कविता गोसावी, छाया उदावंत, मनीषा मंडलिक या महिलांचे विशेष राहणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान महिलांच्या हळदीकुंकु कार्यक्रमासोबत अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पारायण समाप्तीच्या दिवशी श्री साई चरित्र ग्रंथ दिंडी शोभा मिरवणूक हे या सोहळ्याचे खास वैशिष्ट्ये आहे. ज्यांना या पारायण सोहळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी आपली नावे मुंबादेवी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्याकडे नोंदवावीत असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे





