विकास कामे मार्गी लावा व नागरिकांच्या अडचणी सोडवा राष्ट्रवादीचे निवेदन

विकास कामे मार्गी लावा व नागरिकांच्या अडचणी सोडवा राष्ट्रवादीचे निवेदन

NCP’s statement to facilitate the development works and solve the problems of the citizens

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 18.00
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : शहरातील प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लावून नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात असे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना सोमवारी (१८जुलै) दिले आहे.

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लवकरात लवकर शासकीय अनावरण करावे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे पूर्ण कराव्यात, विविध प्रभागांतील रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा, रोगराई थांबविण्यासाठी शहरात कीटकनाशक धूर फवारणी करावी. डबक्यांमधले पाणी काढण्यात यावे व सर्वच गटारी वाहत्या कराव्या आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, अंबादास वडांगळे, बाळासाहेब पवार, एकनाथ गंगूले, किरण आढांगळे, माणिक जाधव आदी उपस्थित होते.

चौकट – राजकारणापोटी विरोधकांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे होणारे शासकीय अनावरण आजवर थांबवलं आहे. या झाकलेल्या पुतळ्याचे आच्छादन काढत आहे. असे पुतळ्याचे आच्छादन काढणे हा अण्णाभाऊ साठे यांचा अनादर असून अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो- सुनिल गंगुले 

Leave a Reply

You cannot copy content of this page