गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी; स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाला यश.

गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी; स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नाला यश.

Godavari canals overflow water; affection Snehalata Kolhe’s effort was successful.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 18.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : नाशिक कार्यक्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने दारणा गंगापूर धरण भरण्याच्या मार्गावर आहे, गोदावरी नदीला नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन पाण्याचा विसर्ग सुरू आहे, गोदावरी कालवे कोरडेच आहेत तेंव्हा या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी गोदावरी उजवा आणि डाव्या कालव्यांना तात्काळ ओव्हरफलोचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका निवेदनाद्वारे केली होती त्याप्रमाणे कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कडे पाण्याची मागणी केली होती  आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगांव तालुका कार्यक्षेत्रात यंदाचा पावसाळा उशीरा सुरू झाला. बारमाही गोदावरी कालवे लाभक्षेत्र विस्तीर्ण आहे, पशुधन जगविण्यासाठी हिरव्या चा-याची आवश्यकता आहे त्यासाठी गोदावरी कालव्यांना ओव्हरफलोचे पाणी सोडले तर त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे याभागातील पाण्यांची पातळी देखील वाढण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबद्दल उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभाग नाशिकचे मुख्य अभियंता, नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंतायांना सौ स्नेहलता कोल्हे यांनी धन्यवाद दिले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page