कोपरगाव : वृध्दाची गळफास घेऊन आत्महत्या; सुरेगाव येथील घटना,
Kopargaon: Elderly man commits suicide by hanging; Incident at Suregaon,
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 18July, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव येथील एका वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी ( १८जुलै ) सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप दिनकर निकम ( वय ५० ) असे आत्महत्या केलेल्या वृध्दांचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दिलीप निकम हे आपल्या राहत्या घरात झोपले होते. मात्र दुसर्या दिवशी सकाळी रहाते घराच्या समोर कांद्याच्या चाळीत लोखंडी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आले. या घटनेची माहिती मयतांचा मुलगा मोतीराम दिनकर निकम, कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला व प्रेताची उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह हा कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. टी. चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.