किर्तन प्रवचनातुन जगाला उपदेश देणारं चालतं बोलतं ब्रह्म म्हणजे नारायणगिरी महाराज- निवृत्ती महाराज इंदोरीकर
Narayangiri Maharaj, Nivrti Maharaj Indorikar, who preaches to the world through kirtan sermons, walks and speaks Brahma.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sun 24July, 18.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : १७५ वर्षांपूर्वी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांनी गावागावात पोहोचवली. अतिशय साधेपणा शिस्त व योग साधनेच्या बळावर त्यांनी समाज हितासाठी खूप काम केले. ज्यांनी देव पाहिला नाही त्यांनी नारायणगिरी महाराज यांना पाहावं ते साक्षात ब्रह्म होते त्यांनी प्रवचन कीर्तनामधून शेवटच्या श्वासापर्यंत जगाला उपदेश केला असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी केले. ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या किर्तन सेवेत बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे नेते नितीन औताडे, सरपंच अमोल औताडे, उपसरपंच प्रशांत रोहमारे, ग्रा.प.सदस्य राजेंद्र औताडे, संचालक डी पी औताडे, अशोकराव नवले, गोरक्षनाथ औताडे, एम. टी. रोहमारे, साईनाथ रोहमारे, निवृत्ती औताडे,कचेश्वर डुबे, निवृत्ती शिंदे, दादासाहेब औताडे, रमेश झांबरे, आप्पासाहेब औताडे, अशोकराव औताडे, नानासाहेब औताडे, मधुकर औताडे, राजेंद्र कोल्हे, रमेश औताडे, रावसाहेब औताडे, साहेबराव गोरे, सुदाम मोरे, मधुकर पोटे, दिनकर औताडे, अर्जुन पवार, बाळासाहेब देशमुख, राजेंद्र मोराडे, चांगदेव कांदळकर, रघुनाथ देवडे, गजानन वाघ, प्रकाश औताडे, प्रकाश रोहमारे, निवृत्ती जोंधळे, शंकर वाघ, किशोर वाघ, श्रीहरी घोटेकर, बाबुराव वाघ, नवनाथ पवार, चंद्रकांत औताडे, कारभारी रोहमारे , चांगदेव कांदळकर, शिवाजी जावळे, आदींसह भजनी मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विज्ञानाबरोबर मुलांना अध्यात्माचे ही धडे द्या तर नवी पिढी वाचेल, शाळेतील मुलांना हरिपाठ अभंग याचे ज्ञान द्या त्याचा अर्थ समजून सांगा. रोज पाच मिनिटे अध्यात्माचे शिक्षण द्या असे सांगत बंद पडलेला पोहेगाव अखंड हरिनाम सप्ताह सद्गुरु गंगागिरीजी महाराज व ब्राह्मलिन नारायण गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने पुन्हा सुरू झाला आहे आता तो कधीच बंद पडणार नाही असेही इंदुरीकर महाराजांनी सांगितले.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे संतपूजन शिवसेनेचे नितीन औताडे व राजेंद्र कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी सप्ताह कमिटीच्या वतीने सर्व भाविकांचे आभार मानण्यात आले.
चौकट …. बहुचर्चित असलेल्या पोहेगांव येथील राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सरला बेट चे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते उद्या मंगळवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…