धामोरीच्या काळे गटाच्या कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश
Entry of Dhamori’s kale group activists into Kolhe group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 25July, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : तालुक्यातील धामोरी येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय निवृत्ती शेलार व त्यांच्या सहका-यांनी भारतीय जनता पक्ष, कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला.
सर्वश्री. दिलीप निवृत्ती शेलार, राजेंद्र निवृत्ती शेलार व प्रदिप दत्तात्रय भूसे यांनीही यावेळी कोल्हे गटात प्रवेश केला.
दत्तात्रय निवृत्ती शेलार म्हणाले की, विवेक कोल्हे यांनी युवकांचे संघटन उत्तमरित्या करून तालुक्यावर कोसळलेल्या प्रत्येक आपत्तीत येथील रहिवासीयांचे साथ दिली. बिपीन कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सत्ता असो अगर नसो पण येथील प्रत्येक कार्यकर्ता हा आपला आहे त्याच्या सुख-दुःखात वेळप्रसंगी त्याच्या मागे उभे राहण्यांत मोलाची भूमिका बजावली आहे. धामोरीसह पंचकोशीच्या विकासात साथ करणार असल्याचे ते म्हणाले.
विवेक कोल्हे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने तळागाळातील प्रत्येकाचा विचार करून त्यांच्या विकासाला सर्वप्रथम प्राधान्य दिले. धामोरीच्या शेलार बंधुनी जो निर्णय घेतला त्याला साथ देवुन प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू.