रोकडसह दहा लाखाचे सोन्याचे दागिने परत केले
Gold jewelery worth ten lakhs returned along with cash
सामान्य माणसाचा असामान्य प्रामाणिकपणाThe uncommon honesty of a common man
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 14.10
By
राजेंद्र सालकर
शिर्डी : इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांच्या पिशवीत सुमारे दहा लाखांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये सापडले होते पंरतू मनात कुठलाही मोह न बाळगता राहाता शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी सापडलेली दहा लाखाची दागिने व रोख रक्कम निरपेक्ष भावनेने इमाने इतबारे ग्राहकास परत केली आहे प्रामाणिक पणाबद्दल लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे
सोने पैसा संपत्ती यांचे आकर्षणा पायी भ्रष्ट झालेल्या सध्याच्या युगात प्रामाणिकपणा शोधूनही सापडणे कठीण आहे परंतु जग कितीही बदलला तरी प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात शिल्लक आहे याचा अनुभव राहाता शहरात नुकताच आला आहे शहरातील लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांच्याकडे एक पिशवी भरून कपडे इस्त्री साठी एका ग्राहकाने आणले होते कामाच्या व्यस्ततेमुळे दोन-तीन दिवस या पिशवीतील कपडे इस्त्री करणे शक्य झाले नाही त्यानंतर तिसऱ्या दिवशी इस्त्री साठी पिशवीतील कपडे बाहेर काढत असताना राजेश वाघमारे यांना त्या पिशवीत एक छोटीशी कापडी थैली आढळून आली यामध्ये सोन्याची कर्णफुले नथ बांगड्या व इतर दागिने तसेच रोख रक्कम वीस हजार रुपये आढळून आली लॉन्ड्री मालक वाघमारे यांनी लागलीच याबाबतची माहिती संबंधित ग्राहकाला फोन द्वारे दिली व दुकानात येऊन आपले सोन्याचे दागिने व रक्कम घेऊन जाण्याची विनंती केली संबंधित ग्राहकाला आपल्या पिशवीत सुमारे दहा लाख किमतीचे सोन्याचे दागिने व वीस हजार रुपये होते याची पुसटशी कल्पना सुद्धा नव्हती असे असताना सुद्धा पारंपारिक व्यवसाय असलेल्या राजेश वाघमारे या लॉन्ड्री चालकाने आपली प्रामाणिकता जपून ठेवत संबंधित सोन्याचे दागिने व पैशाचा कुठलाही मोह न ठेवता ग्राहकाला परत देऊन टाकले वाघमारे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल राहता शहर पिंपळस विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब निरगुडे व लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते तसेच संचालक पोपटराव घोगळ राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे डॉ के वाय गाडेकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ स्वाधीन गाडेकर पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब मेहत्रे वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेवराव लावरे साई निर्माण उद्योग समूहाचे संचालक हाजी मुन्नाभाई शहा समता सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर मिलिंद बनकर मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश जाधव सुनील निचिते सुनील वाणी कांता तुपे उमेश तुपे शिक्षक नेते संजय वाघमारे आदी मान्यवरांनी प्रामाणिकपणाबद्दल लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांचा सपत्नीक सहपरिवार भव्य दिव्य सत्कार केला आहे याप्रसंगी पिंपळस येथील प्रगतशील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब निरगुडे म्हणाले मी दुकानात बसलेलो असताना माझे समोर सोन्याचे दागिने व रक्कम सापडली परंतु कुठलीही अपेक्षा न बाळगता राजेश वाघमारे यांनी तात्काळ ग्राहकाला फोन करून याची कल्पना दिली व दागिने आणि रक्कम परत केली त्यांचा हा प्रामाणिकपणा कौतुकास्पद असल्याचे सांगितले यावेळी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले बालपणापासून व्यावसायिक राजेश वाघमारे व आमच्या परिवाराचा कौटुंबिक स्नेह आहे अनावश्यक कुठलाही लोभ मनी न बाळगता व्यवसायातील विश्वासार्हता जपण्याचं काम वाघमारे परिवाराने केले आहे समाजात प्रामाणिकपणा विश्वासार्हता जाणीव संघर्ष व तळमळ काय असते याचे मूर्तीमंत व ज्वलंत उदाहरण म्हणजे राजेश वाघमारे असल्याचे यावेळी डॉक्टर स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले
चौकट
पैसा सोने सापडले तर कोणी परत देत नाही सोन व पैसा यावरून वाद होतात गुन्हेगारी वाढली या स्वार्थी जगात पडलेली टाचणी सुद्धा लोकांना आपलीशी वाटते मात्र दहा लाखांची सोन्याचे दागिने व रोख रक्कम 20 हजार रुपये सापडले असताना तसेच आपली वस्तू हरवल्याचे समोरच्यांचे ध्यानीमनी नसतानाही लॉन्ड्री व्यावसायिक राजेश वाघमारे यांनी मनात कुठलाही मोह न बाळगता प्रलोभन न ठेवता निरपेक्ष भावनेने अत्यंत प्रामाणिकपणे संबंधित ग्राहकाला लाखोंचा ऐवज परत करून विश्वासार्हता नीतिमत्ता व प्रामाणिकपणा आजही जगात जिवंत असल्याचे अधोरेखित केले आहे
डॉ स्वाधीन गाडेकर लायन्स क्लब उपाध्यक्ष राहाता
चौकट
लॉन्ड्री हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून आई-वडिलांनी पहिल्यापासून अतिशय चांगले संस्कार व प्रामाणिकपणाची शिकवण दिली आहे त्यामुळे सोने नाणे पैसा यापेक्षाही नीतिमत्ता व व्यवसायातील प्रामाणिकपणा हा खूप किमती आहे याची बरोबरी कशातच होऊ शकत नाही कष्टाचा रुपया आपल्या सत्कारणी लागेल परंतु हरामाचा आपल्याला कधीच पुरणार नाही त्यामुळे कष्टाच्याच पैशाला व कष्टाने घेतलेल्या वस्तूला माझ्या मनात व कुटुंबात चांगले स्थान आहे
राजेश वाघमारे लॉन्ड्री व्यावसायिक राहाता
Post Views:
331