वेदांत भाकरेचे दहावी परिक्षेत स्पृहणीय यश-स्नेहलता कोल्हे.
Vedanta Bhakere’s 10th exam success-Snehlata Kolhe.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 17.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : शिक्षक मुलांना ज्ञानार्जन करून घडवत असतात, परिक्षा हया मुलांचे भवितव्य काय आहे याची शिकवण देतात, संवत्सर लक्ष्मणवाडी सारख्या ग्रामिण भागात राहुन वेदांत राजेंद्र भाकरे याने दहावी परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला त्याचे यश हे स्पृहणीय असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सेहलता कोल्हे यांनी भाजप व संजीवनी उद्योग समूहाच्या सत्कार प्रसंगी केले.अध्यक्षस्थानी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे होते.
सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, शाहु, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह सर्व थोर समाजसुधारकांचा शिक्षण क्रांतीत सिंहाचा वाटा आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील मुला मुलींना दर्जेदार तांत्रीक अभियांत्रीकी, व्यवस्थापन, फार्मसी, सैनिकी आदि के. जी पासुन ते पी. जी पर्यंत शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी १९८२ पासून संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे इवलेसे रोप लावले त्याचा वेलू आज गगनावर गेला आहे. वेदांत भाकरेसह अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणा-या दहावी बारावी हया मुख्य पाय-या आहेत असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी राजेंद्र भाकरे यांनी प्रास्तविक केले. संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, फकिरराव बोरनारे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. शेवटी संजय भाकरे यांनी आभार मानले.





