साथीचे आजार पसरू नये यासाठी योग्य उपाय योजना करा-ना.आशुतोष काळें

साथीचे आजार पसरू नये यासाठी योग्य उपाय योजना करा-ना.आशुतोष काळें

Plan appropriate measures to prevent the spread of epidemics-No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 17.20
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव  – पावसाळा सुरू असून त्यामुळे साथीचे रोग पसरणार नाही यासाठी पंचायत समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशा सूचना श्रीना आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दि सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत दिल्या ल्या आहेत.

ना. आशुतोष काळे म्हणाले की, सध्या पावसाळ्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे.जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स या आजाराला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करून लसीकरणाचा टक्का वाढवावा. अनेक पात्र लाभार्थ्यांना शौचालय मंजूर झाले असून त्या नागरिकांचे शौचालयाचे अनुदान वेळेवर जमा होत नाही अशा नागरिकांच्या तकरी आहेत त्यासाठी या नागरिकांचे अनुदान लवकरात लवकर लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करावे तसेच गाय गोठा, विहिरी, रस्ते अनुदान देखील वेळेत जमा करावे.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजने अंतर्गत मंजूर ग्रामपंचायत कार्यालयाची निविदा लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशा अनेक सूचना ना. आशुतोष काळे यांनी दिल्या तसेच नवीन मंजूर झालेल्या १३ पाणीपुरवठा योजना आणि खोपडी व मंजूर पाणीपुरवठा योजना तांडा वस्ती सुधार योजना, जन सुविधा व अल्पसंख्यांक विकास कामांची सद्यस्थिती यावेळी त्यांनी जाणून घेतली.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, अनिल कदम, श्रावण आसने, मधुकर टेके, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राहुल जगधने, सुधाकर होन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, विस्तार अधिकारी बी.बी. वाघमोडे, कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील कोळपे, कनिष्ठ अभियंता आर.टी. दिघे, ए.पी. दिघे, शाखा अभियंता सी.डी. लाटे, जी.पी. गुंजाळ, पी.आर. शेंडगे, लेखापाल जी.एस. सोनवणे आदी उपस्थित होते.   

Leave a Reply

You cannot copy content of this page