शेतकऱ्यांनी मुदती आंत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे – ना.आशुतोष काळे
Farmers should file 7 water demand applications within the deadline – No. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 19.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी कालव्यातून पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी तातडीने जास्तीत जास्त ७ नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे जमा करावे असे आवाहन ना.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ना.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, गोदावरी कालव्यातून खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. वेळेत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे.
भविष्यात यदाकदाचित पावसाने उघडीप दिल्यास उभ्या पिकांना पाण्याची गरज भासू शकते त्यावेळी या आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी १९ ऑगस्ट पर्यंत सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणी वाटपाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत दाखल करावे असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.