बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचा ५ नं. साठवण तलाव होणार – ना. आशुतोष काळे
5 No. of Kopargaon like Baramati, Srirampur. There will be a storage pond – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26July, 19.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : पाणी पुरवठा व्यवस्था म्हटले की, ज्याप्रमाणे बारामती, श्रीरामपूरचा उल्लेख होतो त्याप्रमाणेच भविष्यात बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचे देखील नाव घेतले जाईल असा विश्वास ना. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. साठवण तलवाच्या कामाला गती देण्यासाठी मी स्वत: पंधरवड्याला त्याचा आढावा घेणार आहे. व मुख्याधिकाऱ्यांना देखील दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मी कन्ट्रक्शन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीने नुकतेच ९५ किलोमीटरच्या वितरण व्यवस्थेचा सर्व्हे सुरु केला आहे. प्राथमिक स्वरूपातील कामास प्रारंभ झाला असून एक महिन्याच्या आत हा सर्व्हे पूर्ण होईल. या योजनेत एकूण ४ पाण्याच्या टाक्या असून याखेरीज एक मुख्य टाकी देखील असून लक्ष्मीनगर मधील जुन्या पाण्याच्या टाकीची दुरुस्ती देखील करण्यात येणार आहे. हा तलाव पूर्ण सिमेंट कॉंक्रिट मध्ये बांधण्यात येणार असून पाणी गळती होवू नये यासाठी खालच्या बाजूस ‘जिओ मेमरेन’ नावाची फिल्म टाकण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा तलाव फक्त बारामती आणि श्रीरामपूर या ठिकाणी असून आता कोपरगावात अशा प्रकारचा तलाव तयार होणार आहे.हि योजना यशस्वीपणे सुरु राहील त्यासाठी विद्युत खर्च कमी करून सौर ऊर्जेचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी १.९३ कोटींचा सोलर प्लांट देखील उभारण्यात येणार आहे.योजना पूर्ण करण्याचा कालावधी जरी दोन वर्षाचा असला तरी दोन वर्षाच्या आत या साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण कसे होईल यासाठी माझे बारीक लक्ष राहणार आहे.मागील अनेक वर्षापासून पाण्यासाठी कष्ट सोसणाऱ्या शहरवासियांना लवकरात लवकर पाणी कसे मिळेच यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न राहतील. त्या पार्श्वभूमीवर ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेच्या सुरु झालेल्या कामाची माहिती देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, संतोष चवंडके, विरेन बोरावके, मंदार पहाडे, दिनार कुदळे, कृष्णा आढाव, सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सुनील बोरा, राजेंद्र फुलफगर, सागर पाटील, पाणीपुरवठा अभियंता ऋतुजा पाटील, नगरपरिषद अभियंता सुनील ताजवे, स्थापत्य अभियंता हर्षवर्धन सुराळकर, मानवसेवा अभियंता गणेश म्हस्के, राहुल कवडे, सुनील मगूकीचा आदी उपस्थित होते.