सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
Saif Tamboli’s selection in the Indian team for the Commonwealth Games
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 27July, 17.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : गौतम पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी सैफ तांबोळी याची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याने कर्मवीर काळे एज्युकेशन गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला सैफ सादिक तांबोळी याची इंग्लंड बर्लिन्गम येथे उद्या (दि.२८) पासून होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक या प्रकारात भारतीय संघात निवड झाली असून नुकताच तो इंग्लंडला रवाना झाला आहे.
आपल्या देशाची जर्सी घालून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करायचे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यासाठी त्या खेळाडूला योग्य मार्गदर्शन व योग्य व व्यासपीठ देवून त्याचा पाया भक्कम करण्याचे काम गौतम पब्लिक स्कूल ने केले केले आहे. त्यामुळे कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सैफ नक्कीच पदक पटकवणार असा त्याच्या प्रशिक्षकांना विश्वास आहे. भविष्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत देखील दिमाखात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करावे अशा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, विश्वस्त ना.आशुतोष काळे, सचिव सौ. चैताली काळे तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी तसेच प्राचार्य नूर शेख व सर्व सहकारी शिक्षकांनी दिल्या आहेत.





