ना. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

ना. काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

no Organized Run for Health Marathon on the occasion of Kale’s birthday

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 19.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : ना आशुतोष काळे यांच्या ३७ व्या वाढदिवस निमित्त ४ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता ३ किमी ,५ किमी ,७ किमी व जेष्ठ नागरिक अशा चार गटात रन फॉर हेल्थ या मॅरेथॉन स्पर्धांचे कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

स्पर्धा संपल्यानंतर या स्पर्धेतील विजेत्यांना त्याच ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप असल्याची माहिती शहर प्रमुख शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अरुण चंद्रे यांनी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन  केले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष प्रतिभा शिलेदार यांनी या स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगुले, महिला शहराध्यक्ष प्रतिभा शिलेदार,अरूण चंद्रे, मंदार पहाडे, विरेन बोरावके, राहुल देवळालीकर, धरमशेठ बागरेचा,सुनील शिलेदार,रमेश गवळी, राजेंद्र वाकचौरे, फकीरमामू कुरेशी, राजेंद्र आभाळे,खरे, नवाज कुरेशी, सचिन गवारे,कृष्णा आढाव,संदीप कपिले,रेखा जगताप, सविता कापरे, नगरसेवक नगरसेविका कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page