कर्मवीर काळे कारखान्यावर  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगत

कर्मवीर काळे कारखान्यावर  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगत

Granthraj Dnyaneshwari Parayan Sohla and Akhand Harinam Week on Karmaveer Kale Factory

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 19.10
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : श्री. क्षेत्र खेडले झुंगे येथील परम पूज्य गुरुवर्य तुकारामबाबा यांच्या प्रेरणेतून कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर  ४७ व्या अखंड हरीनाम सप्ताह व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. वाल्मिक महाराज जाधव यांच्या काल्याच्या किर्तनाने हजारो भाविकांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडली. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते काल्याची दही हंडी फोडण्यात आली.

कर्मवीर शंकरराव काळे यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज व . संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त सुरु केलेली अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा माजी आमदार अशोक काळे व कारखान्याचे चेअरमन ना.आशुतोष काळे यांनी पुढे सुरु ठेवली आहे. सप्ताह काळात नियमित पणे सुरु असलेला हरिपाठ व रात्री ८ ते १० या वेळेत कीर्तनाच्या कार्यक्रमाने सर्व परिसर भक्तीमय झाला होता. ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्येने बसले होते.

काल्याच्या कीर्तन प्रसंगी माजी आमदार अशोक काळे, प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी  संदीप शिरसाठ पदाधिकारी व सप्ताह कमिटीचे सदस्य तसेच हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.               

Leave a Reply

You cannot copy content of this page