श्री. सदगुरू गंगागीर महाराज कॉलेज उज्वल यशाची परंपरा कायम – प्राचार्य डॉ. थोपटे

श्री. सदगुरू गंगागीर महाराज कॉलेज उज्वल यशाची परंपरा कायम – प्राचार्य डॉ. थोपटे

सायन्स (९८.४२%), गौतम आर्ट्स (९१.३१%), संजीवनी कॉमर्स (९१.३१%) टक्के निकाल

वृत्तवेध ऑनलाईन 18 जुलै 2020

By : Rajendra Salkar 

कोपरगाव,
नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर झाला. असून त्यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी यंदाही उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून याही वर्षी इ. १२ वी सायन्सचा निकाल ९८.४२ % लागला असून, वाणिज्य विभागाचा निकाल ९१.३१ % असा, तर कला विभागाचा निकाल ७६.६३ % आहे. विज्ञान शाखेतून उच्चतम गुणप्राप्त विद्यार्थी बोरनारे सार्थक अरुण, पवार जान्हवी प्रमोद व तासकर ऋषिकेश राजेंद्र यांना ८७.६९ % गुण मिळवुन ते महाविद्यालयात प्रथम आले आहेत. द्वितीय क्रमांक भाकरे संध्या बाबासाहेब हिला ८७.३८ % गुण मिळाले आहेत तर कु. पवार प्रदयुम्न ज्ञानेश्वर यास ८५.५४ % गुण मिळवून तो महाविद्यालयात तृतीय आला आहे. तसेच वाणिज्य विभागातील ३ गुणवंत विद्यार्थी क्रमशः प्रथम कुमारी. आढाव प्रसन्ना सतीष ९०.६१ %, द्वितीय कु. खरोटे प्रांजल बाबासाहेब ८९.५३ %, सूर्यवंशी अक्षय राजेंद्र ८८.०० % गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आलेले आहे.
कला विभागातील प्रथम तीन विद्यार्थी – कु. दुशिंग तनुजा राजेंद्र ८१.८४ %, द्वितीय कु. केदार अमोल शरद ८०.४६ % तृतीय क्रमांक गायकवाड इंद्रायणी भिमा ७८.३० % गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ६७.३९ % लागला असून कु. वाणी सिध्दांत संतोष ७०.४६ %, मोरे संकेत जगदीश ६८.०० % व आढाव प्रशांत सुनिल ५७.८४ % गुण मिळवुन हे आपापल्या विभागात प्रथम आलेले आहेत.
महाविद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, व सर्व सन्मानीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. थोपटे, सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, यांनी सर्व गुणवंत विद्यार्थांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page