पनवेल मध्ये क्वारंटाईन सेंटर मधील   महिलेवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध – स्नेहलता कोल्हे

पनवेल मध्ये क्वारंटाईन सेंटर मधील   महिलेवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध – स्नेहलता कोल्हे

महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ?

वृत्तवेध ऑनलाईन 18 July  2020

By : Rajendra Salkar 

कोपरगाव : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आता एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपण या घटनेचा तीव्र निषेध करीत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.

यावर बोलताना सौ. कोल्हे म्हणाल्या, पनवेलमधील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ झाली, असताना गुरुवारी रात्री हा घृणास्पद प्रकार पनवेलमध्ये क्वारंटाईन सेंटरमधील महिला रुग्णावर एका पुरुषाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे महिला कुठेही सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
माणुसकीला काळीमा फासणार्‍या तथा मन सुन्न करणार्‍या निंदनीय घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे
महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याप्रकरणी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. असे घडत राहिले, तर उद्या कोरोनाग्रस्त झालेल्या महिला क्वारंटाईन सेंटर मध्ये सुद्धा जाण्यास धजावणार नाहीत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. असे निंदनीय कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली तरच कुठेतरी असे कृत्य करणाऱ्यांना चाप बसेल असेही त्या म्हणाल्या,

Leave a Reply

You cannot copy content of this page