भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा – सौ स्नेहलता कोल्हे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा – सौ स्नेहलता कोल्हे

Har Ghar Tiranga – Mrs Snehalata Kolhe on the occasion of Amrit Mahotsav of Indian Independence

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Mon 1 Aug, 20.20
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव: भारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने “हर घर तिरंगा” मोहीमेस शासनाने सुरूवात केलेली आहे, आपणही राष्ट्रध्वज दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्याने हर घर तिरंगा मोहीम राबवायची असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, यांनी याबाबत एक कृतीशील कार्यक्रम आखला आहे.असेही त्या म्हणाल्या, प्रत्येक बूथ वर तिरंगा कार्यक्रम ९ ते ११ ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करावी. ११ से १३ ऑगस्ट या कालावधीत “रघुपती राघव राजाराम” भजन “वंदे मातरम्” संपूर्ण गीत लावून प्रत्येक प्रभाग व गावात प्रभात फेरी काढावी नागरिकांनाही राष्ट्रध्वज खरेदी करण्यास प्रोस्ताहित करावे. युवा मोर्चा तर्फे १०, ११ आणि १२ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्हयात तिरंगा सायकल यात्रा काढावी, प्रभात फेरी, तिरंगा फडकवणारे प्रत्येक घर आणि राष्ट्रध्वज यांचे फोटो व व्हिडियो सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रसिध्दीची योजना तयार करून, अभियान यशस्वी करावे, या कार्यक्रमात पक्षाचे स्थानिक, लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, नगरसवक, जिल्हा परिषद पंचायत समिती प्रकोष्ठ पदाधिकारी यांचा सहभाग निश्चित करावा. कार्यक्रम शांततेत व देशभक्तीच्या भावनेने आणि राष्ट्रीय अभिमानाने उत्साहपूर्वक साजरा करावा. सर्व भारतीयांचे सहकार्य या अभियानात जाणीवपूर्वक घेण्यात यावे.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,बाळासाहेब निकोले, बापुसाहेब सुराळकर,संदिप गायकवाड, गोरखभाऊ आहेर, चंद्रकांत शिवरकर, सचिन कोल्हे, सुभाष गायकवाड, संतोष सुराळकर, विजय कोर, सुरेश शिंदे, शिवाजी दवंगे, अतुल सुराळकर, अशोक भनगडे, किरण गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रविंद्र काकड, किशोर कोल्हे, दत्तात्रय सुराळकर, भास्कर आहेर, संतोष सुराळकर, शंकर पाईक, अनिल पाईक सर, मारुती पाईक, दिपक कोल्हे, प्रदिप आहेर, उमेश कोकाटे, अमोल झावरे, उत्तम पाईक, बाबासाहेब गायकवाड, निलेश भाकरे, विजय नागरे, रमेश वाघ, पी.एस.डहाके, रामराव डुंबरे, आर.बी.निकम, वैशाली कोल्हे, वंदना गायकवाड, मोनाली आहेर , संगिता चिंचोले, उषा चिंचोले, निता गायकवाड, पी.एल.वाघ, निफाडे एस.एस., वाघ एस.आर. , निलिनी झावरे, कल्पना कळसकर, अनिता मुरकुटे, छाया कांबळे, कैलास शिंदे, नाना डोळस, स्वाती आढाव, अलका कदम, आयुब शेख, संतोष शिंदे आदींसह भाजपचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध स्तरातील नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page