संजीवनी सैनिकी स्कूल ची स्थापना ग्रामीण भागातील सैनिक अधिकारी घडावेत यासाठीच – सुमित कोल्हे

संजीवनी सैनिकी स्कूल ची स्थापना ग्रामीण भागातील सैनिक अधिकारी घडावेत यासाठीच – सुमित कोल्हे

Sanjeevani Military School was established to make military officers from rural areas – Sumit Kolhe

संजीवनी सैनिकी स्कूलचा २२ वा स्थापना दिन22nd Foundation Day of Sanjeevani Sainiki School

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 15.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव: माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण मुलांमध्ये देशभक्ती भावना वाढीस लागून त्यांनी सैनिक अधिकारी बनावे अथवा कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक काम करून देशाची सेवा करावी, या हेतुने माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर काॅलेजची स्थापना केली असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी इन्स्टिट्यूट चे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सैनिकी स्कूलच्या २२ व्या स्थापना दिनी केले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या विचारधारेतुन देशाचे आदर्श नागरीक घडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.

यावेळी संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालय व हाॅस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. रामेश्वर पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यावेळी सचिव  ए. डी. अंत्रे, स्कूल डायरेक्टर डी. एन. सांगळे, प्राचार्य डाॅ. जी.बी. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. कैलास दरेकर उपस्थित होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी होती. प्रारंभी सरस्वती पूजन व कै. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

सुमित कोल्हे यांनी पुढे म्हटले की मागील २२ वर्षांपासून आदर्श विद्यार्थी येथे घडले आहेत. अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या स्पर्धा बघता एनडीए, जेईई, एनईईटी अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिकचे प्रयत्न केले जातील.

डाॅ. पवार म्हणाले की, येथे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भाग्यवान आहेत. ते म्हणाले की आपले कार्यकर्तृत्व एवढे खुलवा की त्यासाठी मिळालेली शिस्त व ज्ञान हे संजीवनी मधुन मिळाले असे अधोरेखित झाले पाहीजे.

श्री ए. डी. अंत्रे म्हणाले की विद्यार्थ्यांचे  करीअर घडविण्यासाठी संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांमध्ये भरपुर संधी आहेत. 

डी. एन. सांगळे म्हणाले की येथे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत येथिल सर्व शिक्षक विध्यार्थ्यांकडून  अभ्यासासहित विविध उपक्रम करून घेतात, त्याचे कारण म्हणजे ज्या विश्वासाने  पालकांनी त्यांच्या पाल्यास येथे दाखल केले, तो विश्वास  सार्थ ठरून प्रत्येक विध्यार्थी यशस्वी झाला पाहीजे.

डाॅ. गायकवाड यांनी मागील  २२  वर्षातील वर्षातील  स्कूलचा चढत्या कमानीचा आलेख सांगीतला. ते म्हणले की प्रत्येक जिल्ह्यालाला फक्त एकच सैनिकी स्कूल असते, परंतु माजी मंत्री  शंकरराव  कोल्हे यांच्या आग्रहास्तव सरकारला अहमदनगर जिल्ह्यात  दुसरे सैनिकी स्कूल मंजुर करावे लागले. उपप्राचार्य कैलास दरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

सदर प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपले मनोगते व्यक्त करून त्यांच्या जडणघडणीत स्कूलची कशी मदत होत आहे हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन आण्णासाहेब थोरात यांनी केले तर नाना वाघ यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात स्कूलच्या स्थापना दिना निमित्ताने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. .

Leave a Reply

You cannot copy content of this page