मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात माजीमंत्री कोल्हेंचे मोठे योगदान – विवेक कोल्हे 

मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात माजीमंत्री कोल्हेंचे मोठे योगदान – विवेक कोल्हे

Former minister Kolhe’s great contribution in bringing the backward classes into the stream of development – Vivek Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 2 Aug, 15.40
By
राजेंद्र सालकर

कोपरगांव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सर्व समाज बांधवांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवीन कल्पना घेऊन त्याद्वारे कार्य केले. येथील मागासवर्गीय समाजाला ठिकठिकाणी विविध पदे देत त्यामाध्यमांतून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल केले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सोमवारी लुंबिनी बौद्ध विहार येथील सत्कारप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव गंगावणे होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन जितेंद्र रणशुर, भीमराव गंगावणे, जेऊर कुंभारी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, नाना रोकडे आदींनी केले.

उपाध्यक्ष रमेश घोडेराव म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाच्या नेतृत्वाने देशात सहकारी साखर कारखानदारीत अनेक धाडसी प्रकल्प सुरु करुन विशेष ओळख निर्माण केली त्या कारखान्याचे संचालक आणि उपाध्यक्ष या दुहेरी पदावर प्रथमच कामाची जबाबदारी बिपीन कोल्हे यांनी टाकली त्यांचा विश्वास सार्थ ठरवू.

प्रारंभी उत्तर महाराष्ट्र रिपाई आठवले गटाचे. सचिव दिपक गायकवाड यांनी प्रास्ताविकात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन  कोल्हे, भाजपाचे प्रदेशाची स्नेहलता कोल्हे यांनी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा लेखाजोखा मांडत, संजीवनी उद्योग समूहच्या नेतृत्वाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीचा मूलमंत्र जपला आहे.

ॲड. भास्करराव गंगावणे म्हणाले की सहकारी संस्था या ग्रामीण अर्थकारणाच्या मुख्य केंद्रबिंदू असून त्यात उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली हे येथील मागासवर्गीय समाजाचे मोठे भाग्य आहे.

याप्रसंगी अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान, संचालक ज्ञानेश्वर चिलीया होन, ज्ञानेश्वर परजणे,.ज्ञानदेव पाराजी औताडे, त्र्यंबकराव सरोदे,बापूसाहेब बारहाते, आप्पासाहेब दवंगे, सतिष आव्हाड, संजीवनी पतसंस्थेचेे अध्यक्ष प्रदीप नवले, उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, साहेबराव कोपरे, विनोद राक्षे, शांताराम रणशुर, राजेंद्र गायकवाड, मुकुंद काळे, सौ. उज्वला रणशुर, जालिंदर चव्हाण, शरद त्रिभुवन, सोमनाथ म्हस्के, गोपीनाथ गायकवाड, सतिश रानोडे, सोमनाथ ताकवले, सुजल चंदनशिव, अनिल पगारे, सौ. हर्षदा कांबळे, दिनेश कांबळे, राजेंद्र बागुल, अरुण विघे, अर्जुन मरसाळे प्रदिप गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी जितेंद्र रणशूर यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page