हर घर तिरंगा : समता पतसंस्थेचे दहा हजार तिरंगा ध्वज विक्रीसाठी तयार

हर घर तिरंगा : समता पतसंस्थेचे दहा हजार तिरंगा ध्वज विक्रीसाठी तयार

Har Ghar Tricolor: Ten thousand tricolor flags of Samata Credit Institution ready for sale

“ना नफा ना तोटा”  तिरंग्याची किंमत फक्त २५ रुपये Neither Profit nor Loss” Tricolor cost only Rs.25

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 6 Aug, 19.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील समता पतसंस्थेच्या पुढाकाराने ना नफा ना तोटा या तत्त्वावर दहा हजार तिरंगा ध्वज तयार करण्यात आले असून त्याच्या विक्री शुभारंभ शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते करण्यात आला. कोयटे हे सतत विविध उपक्रम करण्यात व प्रत्यक्ष राबवण्यात सतत आघाडीवर असतात त्यापैकीच हा उपक्रम आहे.

याप्रसंगी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे, राजेंद्र बंब, गुलशन होडे नंदकुमार डागा व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते .                   
कोयटे म्हणाले भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशात राबविण्यात येत असून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात  समता नागरी सहकारी पतसंस्था संचलित समता महिला बचत गट देखील या उपक्रमात सहभागी होत असून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना तिरंगा ध्वज समताज सहकार मिनी मॉलमध्ये तसेच समता पतसंस्थेच्या प्रत्येक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.                                         
तिरंगा ध्वज तयार करण्यासाठी समता महिला बचत गटातील २५ महिलांनी रात्रं-दिवस मेहनत घेतली असून १० हजार तिरंगा ध्वज तयार केले आहे.समता महिला बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या या तिरंग्याची किंमत फक्त २५ रुपये आहे.                               
तालुक्यातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी अतिशय कमी दरात समताज सहकार मिनी मॉलमध्ये उपलब्ध असलेल्या तिरंगा ध्वज घेऊन १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान तालुक्यातील प्रत्येक घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून या उपक्रमात सहभागी व्हावे. असे आवाहन माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी केले आहे.
 त्या पुढे म्हणाल्या की, घरोघर लावलेल्या तिरंगा ध्वजांचा गैरवापर होऊ नये, त्यासाठी ते तिरंगा ध्वज पुन्हा समता पतसंस्थेत देण्यासाठी ०८०६९१६५५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क केल्यानंतर समता पतसंस्थेचे कर्मचारी आणि समता स्कूलचे विद्यार्थी घरोघरी जाऊन गोळा करणार आहे.
 भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात, पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना त्यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची भावना कायम स्वरूपी प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनात राहावी या उद्देशाने केंद्र शासनाने या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page