संजीवनी आपत्कालीन यंत्रणेमुळे तळघरातील गाळेधारकांनी घेतला मोकळा श्वास 

संजीवनी आपत्कालीन यंत्रणेमुळे तळघरातील गाळेधारकांनी घेतला मोकळा श्वास 

Due to the Sanjeevani emergency system, the slum dwellers breathed a sigh of relief

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 Aug, 16.00
By
राजेंद्र सालकर

 कोपरगाव : संजीवनीची आपत्कालीन यंत्रणा सज्ज, नको पाहणी, नको सूचना, नको फोटो सेक्शन तिसऱ्या दिवशी सुद्धा थेट काम सुरू  करून पाणी उपसा केल्याने  कोपरगाव शहरातील विविध भागातील तळघरात असलेल्या गाळेधारकांनी मोकळा श्वास घेतला. संजीवनी कारखान्याने केलेल्या आपत्कालीन मदतीचे या सर्व गाळेधारक नागरिकांनी आभार व्यक्त केले

रविवार सोमवार झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले तर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलातील तळघरातील गाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी  साचलेत्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  हे पाणी बाहेर काढणे मोठे विक्रीचे झाले होते अशावेळी या  गाळेधारकांच्या मदतीसाठी  संजीवनी  कारखान्याची  आपत्कालीन व्यवस्था धावून आली. 
तिलक अरोरा, वाणी कॉम्प्लेक्स, गुरुद्वारा रोड भाजी मार्केट, पप्पूशेठ लोंगाणी,  राम मंदिर, रमेश मोरे शॉपिंग कॉम्प्लेक्स संभाजी सर्कल, ओम निवारा कॉम्प्लेक्स निवारा, साई साक्षी मोबाईल शॉपी, श्री साईनाथ लॉड्री, साई शीतल लॉड्री, गुडलक सलून, संतोष आर्टस देवकीनंदन येवला रोड, पटेल वखार समोरील गाळे आदी दुकाने पाण्याखाली गेली होती. या दुकानांमध्ये कंबरेइतके पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. येथील व्यापाऱ्यांनी वारंवार सांगूनही नगरपालिका प्रशासनाने काहीच उपाययोजना केली नाही. विवेक कोल्हे यांनी तातडीने संजीवनी आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी पाठविली व  तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर शर्थीचे प्रयत्न करून  उपसा केल्याने येथील गाळेधारकांनी घेतला मोकळा श्वास घेतला व संजीवनी यंत्रणेचे आभार व्यक्त केले
मंगळवारी सकाळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान आणि माजी नगरसेवक जनार्दन कदम  भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले,  सतीश जाधव,  सेफ्टी ऑफिसर  शेख साहेब मॅनेजर प्रकाश डुंबरे व अग्निशामन दलाचे कर्मचारी आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
कोपरगाव शहरावर ज्या ज्या वेळी आपत्कालीन संकट कोसळले किंवा साथीच्या रोगाचे संकट आले त्यावेळेस स्वर्गीय शंकरराव कोल्हे त्यानंतर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी कोपरगावकरांना मदतीचा हात दिला. काल झालेल्या मुसळधार पावसाचे वेळी युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगावच्या नागरिकांना मदत चा हात व दिलासा दिल्यामुळे  साहेबांच्या व दादाच्या आठवणी ताज्या झाल्या. 

Leave a Reply

You cannot copy content of this page