सरलाबेट आळंदी आश्रमास माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंच्या स्मरणार्थ ११ लाखाचा देणगी
Former Minister of Sarlabet Alandi Ashram. Donation of 11 lakhs in memory of Shankarao Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 10 Aug, 16.10
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : प. पू. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची गोडी जगभरातील भाविकांना लागली असुन नारायणगिरी महाराजांच्या नंतर महंत रामगिरी महाराज हा वसा समर्थपणे पुढे नेत आहेत. श्रीक्षेत्र कोकमठाण येथे पार पडलेल्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहात सराला बेटाच्या आळंदी आश्रमास भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी महंत रामगिरी महाराजांना ११ लाख रूपयांचा देणगी धनादेश सुपूर्द केला.
सौ. स्नेहलता कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, महंत नारायणगिरी महाराजांचे देहावसन २० मार्च २००९ रोजी झाले. तत्पुर्वी ते १८ फेब्रुवारी २००९ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान खास माजीमंत्री शंकरराव कोल्हेंच्या भेटीसाठी संजीवनी कार्यस्थळावर आले होते. त्यावेळी त्यांचा यथोचीत सत्कार करण्यांत आला. सत्कार कार्यक्रम आटोपल्यावर महंत नारायणगिरी महाराज यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याशी बंद खोलीत महत्वाच्या विषयावर निवांत चर्चा देखील केली होती. महंत नारायणगिरी महाराजांचा संजीवनीशी अतुट संबंध होता. अध्यात्मातून त्यांनी अनेक हि-यांना पैलू पाडत घडविले आहे.
महंत रामगिरी महाराजांनी कोकमठाण तीर्थक्षेत्री अलोट लाखो भाविकांच्या उपस्थितीत १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची ऐतिहासिक सेवा देवुन सर्व भाविकांना संस्काराच्या माध्यमातुन तृप्त केले आहे.
युवानेते विवेक कोल्हे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी गंगागिरी महाराजांचा सप्ताह होतो त्या त्या वेळी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने तनमनधनाने प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थक्षेत्र कोकमठाणच्या भूमिस प्राचीन ऐतिहासिक परंपरा असुन संत महंतांच्या पदस्पर्शाने गोदाकाठचा दंडकारण्यमय परिसर पवित्र झालेला आहे आणि १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची अनुभूती याची देही याची डोळा आपल्यासह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या शेकडो युवकांना तसेच हजारो स्वयंसेवकांना अनुभवता आली.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हेंच्या तोंडुन सप्ताहाच्या ऐकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या आहे परम भाग्याचे लक्षण असून सरलाबेटाचे अध्यात्मीक, धार्मीक, सांस्कृतिक महत्व वाढत असुन महंत रामगिरी महाराजांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा आपला अल्पसा प्रयत्न असल्याचे ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे प्रमुख, भाजपाच्या अध्यात्मीक आघाडीचे राज्यप्रमुख तुषार भोसले, मधु महाराज यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते.