घरकुलाचा होणार फेरसर्वे ना. आशुतोष काळे यांचे यश ;
Gharkula will be resurveyed. Ashutosh Kale’s success;
५००० पेक्षा जादा कुटुंबांना मिळणार लाभMore than 5000 families will get benefit
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed10 Aug, 18.50
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील गरजू पात्र कुटुबांना घरकुलाच्या यादीतून वगळण्यात आले होते. त्याबाबत या नागरिकांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्याची दखलघेऊन ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून या पात्र कुटुबांना घरकुलाचा लाभ देण्यासंदर्भात फेरसर्वे करण्यात येणार असल्याची माहिती ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या निर्देशाप्रमाणे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुबांना ज्यांना स्वतःचे घर नाही अशा नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून अशा पात्र कुटुबांची ‘आवास प्लस ॲप’ मार्फत नोंदणी करण्यात आली आहे. मात्र मंजूर करण्यात आलेल्या घरकुलाच्या यादीत मतदार संघातील अनेक गावातील हजारो पात्र कुटुबांचे नाव नसल्यामुळे हे कुटुंब घरकुलापासून वंचित राहिले होते.
ग्रामीण भागातील अनेक पात्र कुटुबांना काही तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे या पात्र लाभार्थ्यांचा घरकुल मंजूर झालेल्या यादीमध्ये समावेश नव्हता व त्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ देण्याबाबत अपात्र ठरवण्यात आले होते. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे अशा पात्र असणाऱ्या कुटुबांचे फेर सर्वेक्षण करून या कुटुबांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून जे पात्र कुटुंब घरकुलाच्या यादीत आले नाहीत अशा लाभार्थ्यांचा फेर सर्वे करून या कुटुंबांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे.
कोपरगाव मतदारसंघातील जवळपास ५००० पेक्षा जास्त कुटुबांना त्याचा फायदा होणार आहे. ज्या पात्र कुटुबांची नावे घरकुल यादीत आलेले नाहीत अशा कुटुबांचा फेरसर्व्हे करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा कुटुंब प्रमुखांनी आपली अचूक माहिती फेर सर्वे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे द्यावी जेणेकरून पात्र लाभार्थी पुन्हा घरकुलापासून वंचित राहणार नाही.
कोणतीही अडचण आल्यास जनसंपर्क कार्यालयाशी किंवा माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.