स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनकडून चित्रकला स्पर्धा
Nectar Festival of Freedom: Painting Competition by Kopargaon City Police Station
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 12 Aug, 18.00
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : येथील शहर पोलीस स्टेशनच्या वतीने वेगवेगळया शाळेतील ७५ मुले व मुली यांच्यात स्वतंत्र व राष्ट्रध्वज या विषयावर राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा झाल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी उपस्थित मुलांना स्वतंत्रप्राप्ती व राष्ट्रध्वज बाबत माहीती दिली. तसेच त्यांना पोस्टे आवार दाखवुन पोलीसांची कार्यपध्दती, मुलांविषयी होणारे सायबर गुन्हे, वाहतुक नियम व मुलींना त्यांचे सुरक्षेविषयी मार्गदर्शन करुन खाऊ वाटप करण्यात आला आहे.
सदरची राष्ट्रप्रेम चित्रकला स्पर्धा हि पोलीस अधिक्षक .मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर ,.उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे आयोजीत केली होती.
या स्पर्धेमधील विद्यार्थ्यांचे १५ ऑगस्ट रोजी प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजनार्थ तसेच इतर सहभागी सर्व विद्यार्थ्याना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजीत आहे. तसेच १३ अगस्ती ते १७ ऑगस्ट पर्यंत या कालावधीत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Post Views:
202